Home /News /sport /

IND vs SL : श्रीलंकेत टीम इंडियाच्या पहिल्या ट्रेनिंग सेशनचा VIDEO, राहुल द्रविड म्हणाला...

IND vs SL : श्रीलंकेत टीम इंडियाच्या पहिल्या ट्रेनिंग सेशनचा VIDEO, राहुल द्रविड म्हणाला...

श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) क्वारंटाईन कालावधी संपला आहे, यानंतर खेळाडूंनी पहिलं ट्रेनिंग सेशन केलं. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंच्या या ट्रेनिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.

    कोलंबो, 3 जुलै : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) क्वारंटाईन कालावधी संपला आहे, यानंतर खेळाडूंनी पहिलं ट्रेनिंग सेशन केलं. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंच्या या ट्रेनिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. श्रीलंकेला यायच्याआधी टीम इंडिया 14 दिवस मुंबईत क्वारंटाईन होती. यानंतर त्यांना श्रीलंकेतही तीन दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं. बीसीसीआयने शेयर केलेल्या या व्हिडिओमध्ये खेळाडू सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविडनेही (Rahul Dravid) प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे, तर शिखर धवन (Shikhar Dhawan) कर्णधार आहे. 'खेळाडू 17-18 दिवस क्वारंटाईन होते, त्यामुळे बाहेर पडून हलका-फुलका सराव करणं चांगलं आहे. लॉनसमोरची मोकळी जागा चांगली आहे. एवढा काळ क्वारंटाईन राहणं सोपं नाही. आता खेळाडू एकमेकांसोबत ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत आहेत,' असं राहुल द्रविड म्हणाला. भारताचे महत्त्वाचे खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नवोदितांना संधी देण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय टीम श्रीलंकेत पोहोचली आणि शुक्रवारपासून सरावाला सुरुवात झाली. खेळाडूंना थेट नेटमध्ये सरावासाठी नेण्याऐवजी द्रविडने श्रीलंकेतली परिस्थिती आणि वातावरणाशी जुळवून घेण्यावर जोर दिला. त्यामुळे खेळाडूंनी लॉनमध्ये स्वत:च्या फिटनेससाठी घाम गाळला. व्हिडिओमध्ये खेळाडू जॉगिंग आणि स्ट्रेचिंग करताना दिसत आहेत. 13 जुलैपासून वनडे सीरिज श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. दौऱ्याच्या सगळ्या मॅच कोलंबोमध्ये होणार आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीम शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक पहिली वनडे- 13 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता दुसरी वनडे- 16 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता तिसरी वनडे- 18 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता टी-20 सीरिज पहिली टी-20 - 21 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता दुसरी टी-20- 23 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता तिसरी टी-20- 25 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Rahul dravid, Team india

    पुढील बातम्या