Home /News /sport /

IND vs SL : श्रीलंकेत टीम इंडियाचा पहिला सामना, हे खेळाडू मैदानात उतरले

IND vs SL : श्रीलंकेत टीम इंडियाचा पहिला सामना, हे खेळाडू मैदानात उतरले

टीम इंडियाचे खेळाडू सध्या श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) आहेत. टीमचे प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंकेत नवोदितांना संधी देण्यात आली आहे. या टीमचं नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करत आहे.

    कोलंबो, 5 जुलै : टीम इंडियाचे खेळाडू सध्या श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) आहेत. टीमचे प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंकेत नवोदितांना संधी देण्यात आली आहे. या टीमचं नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करत आहे. श्रीलंका दौऱ्यात भारत तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे, त्याआधी सोमवारी टीम इंडियाचे खेळाडू इंट्रा स्क्वॉड सामना खेळले. या सीरिजसाठी श्रीलंकेने अजून टीमची घोषणा केलेली नाही. इंट्रा स्क्वॉड मॅचमध्ये फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) मैदानात उतरला. या दौऱ्यात तो टीमचा उपकर्णधार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची टीममध्ये निवड करण्यात आली नव्हती, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. इंग्लंडमध्ये बॉल स्विंग होत असतानाही भुवनेश्वरची निवड न झाल्यामुळे टीका करण्यात आली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा न्यूझीलंडने (India vs New Zealand) पराभव केला. यानंतर आता इंग्लंडविरुद्ध (India vs England) 4 ऑगस्टपासून 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी डावखुरा बॅट्समन नितीश राणाची (Nitish Rana) निवड करण्यात आली आहे. तोदेखील या सामन्यात बॅटिंग करताना दिसला. याशिवाय ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, मनिष पांडे यांनाही बॅटिंगची संधी मिळाली. या दौऱ्यातून देवदत्त पडिक्कलचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न असेल. विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीम शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया नेट बॉलर : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग. भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक पहिली वनडे- 13 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता दुसरी वनडे- 16 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता तिसरी वनडे- 18 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता टी-20 सीरिज पहिली टी-20 - 21 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता दुसरी टी-20- 23 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता तिसरी टी-20- 25 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या