Home /News /sport /

IND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20

IND vs SL : कृणाल पांड्याला कोरोना, जाणून घ्या कधी होणार दुसरी-तिसरी T20

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली दुसरी टी-20 मॅच स्थगित करण्यात आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

    कोलंबो, 27 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली दुसरी टी-20 मॅच स्थगित करण्यात आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी रॅपिड एन्टीजेन टेस्टमध्ये कृणाल पांड्या पॉझिटिव्ह आला, त्यामुळे मंगळवारी होणारा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता भारताच्या सगळ्या खेळाडूंची पुन्हा एकदा आरटी-पीसीआर टेस्ट होणार आहे. कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता टी-20 सीरिजच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली तर बुधवारी दुसरी टी-20 खेळवली जाईल. तर तिसरा सामना नियोजित दिवसानुसारच गुरुवारी 29 तारखेला होईल. कृणालच्या संपर्कात आल्यामुळे टीम इंडियाचे सगळे खेळाडू आयसोलेट झाले आहेत. आरटी-पीसीआर टेस्टमध्ये आणखी खेळाडूंना कोरोना झाल्याचं समोर आलं, तर मात्र टी-20 सीरिज संकटात येऊ शकते. भारतीय टीमसाठी चिंतेचा विषय म्हणजे कृणाल पांड्या 8 जणांच्या संपर्कात आला, यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांचाही समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली आहे. श्रीलंका सीरिज संपल्यानंतर ते लगेच इंग्लंडला रवाना होणार होते, पण आता त्यांच्या प्रवासावरही संकट ओढावलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेला टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishbah Pant) यालाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय थ्रोडाऊन स्पेशलिस्ट दयानंद गरानी (Dayanand Garani) यांची टेस्टही पॉझिटिव्ह आली होती, यानंतर भरत अरुण (Bharat Arun), ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Ishwaran) 10 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये होते. हे तिन्ही खेळाडू दयानंद गरानी यांच्या संपर्कात आले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, India Vs Sri lanka, Krunal Pandya, T20 cricket

    पुढील बातम्या