मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंमध्ये एका जागेसाठी रेस, T20 वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचे

IND vs SL : मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंमध्ये एका जागेसाठी रेस, T20 वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचे

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 2-1 ने विजय झाला. यानंतर आता टी-20 सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी टीम इंडियाची ही अखेरची टी-20 सीरिज आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

कोलंबो, 25 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 2-1 ने विजय झाला. यानंतर आता टी-20 सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी टीम इंडियाची ही अखेरची टी-20 सीरिज आहे, त्यामुळे वर्ल्ड कपसाठी कोणत्या नवोदितांना संधी द्यायची हे या सीरिजवरून ठरण्याची शक्यता आहे.

वनडे सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये इशान किशनला (Ishan Kishan) तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं होतं. पहिल्या वनडेमध्ये त्याने धमाकेदार अर्धशतक केलं होतं, तर तिसऱ्या वनडेमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली होती. पहिल्या टी-20 मध्ये ओपनर म्हणून कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांचं खेळणं निश्चित आहे. तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन उतरणार का सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा निर्णय घेताना निवड समितीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वनडे सीरिजमध्ये इशान किशन ज्या पद्धतीने खेळला आहे, ते पाहता त्याला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी तिसरा क्रमांक महत्त्वाचा आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आधी या क्रमांकावर खेळायचा, पण टीमच्या संतुलनासाठी विराट ओपनिंगला खेळण्याचा विचार करत आहे. याचाच सराव म्हणून तो आयपीएलमध्येही (IPL) ओपनिंगला खेळला. विराट आणि रोहित (Rohit Sharma) ओपनिंगला उतरले तर सूर्यकुमार यादव किंवा इशान किशन तिसऱ्या क्रमांकाचे प्रमुख दावेदार असतील. तसंच केएल राहुल (KL Rahul) वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळेल.

श्रीलंकेविरुद्धची ही सीरिज तिसऱ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव का इशान किशन खेळणार, हे निश्चित करेल. सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली होती.

टीम इंडियाचा ओपनर पृथ्वी शॉ याने वनडे सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्याला एकही अर्धशतक करता आलं नाही. टी-20 सीरिजमध्ये तो ही कमी दूर करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याला देखील वनडे सीरिजमध्ये कमाल करता आली नाही, त्यामुळे त्याच्यावरही लक्ष असेल. टी-20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने हार्दिक सगळ्यात प्रमुख खेळाडू आहे.

शिखर धवनने वनडे सीरिजची सुरुवात अर्धशतकाने केली होती. पण अखेरच्या दोन वनडेमध्ये त्याला मोठा स्कोअर करता आला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये धवनला 5 पैकी फक्त एकाच सामन्यात खेळायची संधी मिळाली. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट, रोहित आणि राहुल ओपनिंगचे दावेदार आहेत, त्यामुळे या सीरिजमध्ये धवनला आक्रमक कामगिरी करावी लागणार आहे.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Ishan kishan, Suryakumar yadav, T20 world cup