भारताचा 88 धावांनी श्रीलंकेवर विजय, टी-20 मालिका 2-0 ने जिंकली

भारताचा 88 धावांनी श्रीलंकेवर विजय, टी-20 मालिका 2-0 ने जिंकली

रोहित शर्माच्या तडाखेबाज शतकी खेळीच्या बळावर भारतानं श्रीलंकेपुढे विजयासाठी २६१ धावांचा लक्ष्य ठेवलं होतं.

  • Share this:

22 डिसेंबर : कसोटी, एकदिवशीय आणि आता टी-20मध्येही भारताने श्रीलंकेचा डंका वाजवत मालिका खिश्यात घातलीये. टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 88 धावांनी पराभव केला.

रोहित शर्माच्या तडाखेबाज शतकी खेळीच्या बळावर भारतानं श्रीलंकेपुढे विजयासाठी २६१ धावांचा लक्ष्य ठेवलं होतं. 261 धावांचा पाठलाग करणारी लंकनं टीम अठराव्या षटकातच 179 धावांवर गारद झाली. कुशल पेरेराच्या 77 धावांच्या खेळीवर लंकेनं पाठलाग केला खरा पण भारतीय गोलदाजांनी लंकेच्या एका खेळाडूला मैदानात उभं राहु दिलं नाही. कुशल 77 तर उपूल थरंगाने 47 धावांच्या खेळी व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला मोठा स्कोअऱ उभारता आला नाही. अवघा संघ 172 धावांवर ढेर झाला. भारताने दुसऱ्या टी-20मध्ये विजय मिळवत सिरीज खिश्यात घातलीये.

रो'हीट' पराक्रम

त्याआधी भारताने पहिली बॅटिंग करत धावांचा पाऊस पाडला. ओपनिंगला उतरलेल्या रोहित शर्मा आणि लोकश राहुलने दणक्यात सुरुवात केलीये. रोहित शर्माने अवघ्या 23 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार लगावत अर्धशतक झळकावले. अर्धशतक झाल्यानंतर रोहितने लंकनं गोलंदाजाची धुलाई केली. अवघ्या 35 चेंडूत रोहितने खणखणीत शतक झळाकवले. आता टी-20 क्रिकेटमधील वेगवान शतकाचा विक्रम रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मीलरच्या नावे झाला आहे. रोहित शर्मा 118 धावा फटकावत माघारी परतला. यात 12 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश आहे.

मात्र तोपर्यंत त्याने टी-20मधील अनेक विक्रम नावावर कले आहे. इंदुरच्या मैदानात विराट कोहली आणि विरेंद्र सेहवागने कर्णधार म्हणून शतक झळकावले आहे. वेस्टइंडिज विरुद्ध 8 नोव्हेंबर 2011 ला एकदिवशीय सामन्यात सेहवाने दुहेरी शतक झळकावले आहे. 149 चेंडूत सेहवागने 219 धावा कुटल्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर द्विशतक झळकावणार सेहवाग हा दुसरा भारतीय ठरला होता.

मागील वर्षी विराट कोहलीने न्युझीलंड विरुद्ध इंदुर इथं कसोटी सामन्यात 211 धावांची विक्रमी खेळी केली होती. कर्णधार म्हणून विराटच्या नावावर द्विशतकाच्या विक्रमाची नोंद झालीये.

आता याच मैदानावर टी-20 सामन्यात रोहित शर्माने कर्णधार म्हणून शानदार शतक झळकावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 10:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading