मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : श्रीलंकेला भारताविरुद्धची सीरिज रद्द होण्याची भीती! हे आहे कारण

IND vs SL : श्रीलंकेला भारताविरुद्धची सीरिज रद्द होण्याची भीती! हे आहे कारण

इंग्लंडच्या खेळाडूंना (England Cricket) कोरोनाची लागण झाल्यानंतर आता भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिज वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

इंग्लंडच्या खेळाडूंना (England Cricket) कोरोनाची लागण झाल्यानंतर आता भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिज वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

इंग्लंडच्या खेळाडूंना (England Cricket) कोरोनाची लागण झाल्यानंतर आता भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिज वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

कोलंबो, 6 जुलै : इंग्लंडच्या खेळाडूंना (England Cricket) कोरोनाची लागण झाल्यानंतर आता भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिज वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यावरून परत येणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या घरी जाण्यावर बंदी घातली आहे. भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजआधी श्रीलंकन टीम इंग्लंडविरुद्ध सीरिज खेळून आली आहे. इंग्लंड टीममधले तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंका बोर्डाने खेळाडूंना घरी पाठवण्याऐवजी बायो-बबलमध्ये पाठवलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात 13 जुलैपासून वनडे आणि टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे. 'श्रीलंकेची टीम आज कोलंबोमध्ये पोहोचेल, यानंतर त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल आणि मगच त्यांना दुसऱ्या बबलमध्ये पाठवलं जाईल. रविवारी दौरा संपल्यानंतर खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट ब्रिटनमध्येच केली गेली,' असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा अधिकारी म्हणाला.

'भारताविरुद्धच्या सीरिजला आता फार वेळ उरलेला नाही, त्यामुळे कोणताही खेळाडू घरी जाणार नाही. एका बबलमधून खेळाडू दुसऱ्या बबलमध्ये जातील. जर खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला नियमांचं पालन करावं लागेल आणि क्वारंटाईन व्हावं लागेल,' असं वक्तव्य श्रीलंका बोर्डाच्या अधिकाऱ्याने केलं.

इंग्लंड टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली, यातले 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफ आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजसाठीची संपूर्ण टीमच बदलली. बेन स्टोक्सला (Ben Stokes) या सीरिजसाठी कर्णधार करण्यात आलं आहे, तर 9 खेळाडूंची पहिल्यांदाच इंग्लंड टीममध्ये निवड झाली आहे.

वनडे सीरिजसाठी इंग्लंडची टीम

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बेल, डेनी ब्रिग्स, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉले, बेन डकेट, लुईस जॉर्ज, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, डेविड मलान, साकिब महमूद, क्रेग ओवर्टन, मॅट पार्किनसन, डेविड पेन, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन, जेम्स विन्सी

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Cricket, India Vs Sri lanka, Team india