कोलंबो, 14 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजला 18 जुलैपासून सुरूवात होत आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. इंग्लंड दौऱ्याहून परतलेली श्रीलंकन टीम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर मैदानात सरावासाठी उतरली, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोरोना व्हायरसची भीती साफ दिसत होती. इंग्लंड दौऱ्याहून परतल्यानंतर श्रीलंकेचा बॅटिंग कोच ग्रॅण्ट फ्लॉवर (Grant Flower) आणि डेटा ऍनलिस्ट जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाली. आता श्रीलंकेचे प्रशिक्षक कोरोनाच्या धोक्यापासून बचावासाठी पीपीई किट (PPE Kit) मास्क (Mask) आणि ग्लोव्हज घालून सरावासाठी मैदानात उतरले. क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच हे चित्र पाहायला मिळालं.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सरावाचा हा व्हिडिओ युट्यूबवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये कोच आणि स्टाफ पीपीई किट घालून मैदानात आल्याचं दिसत आहे. श्रीलंकेच्या टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर भारताविरुद्धची सीरिज 5 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली.
13 जुलैपासून भारत-श्रीलंका वनडे सीरिजला सुरुवात होणार होती, पण आता ही सीरिज 18 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडेमधली पहिली वनडे 18 जुलैला खेळेल. तर 25 जुलैपासून तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. सीरिजच्या सगळ्या मॅच कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्य खेळवल्या जाणार आहेत.
फ्लॉवर यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे. इंग्लंडहून परतल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. सगळ्या खेळाडूंना कोलंबोच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर फ्लॉवर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
श्रीलंका टीमच्या मेडिकल स्टाफने इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलं, 'फ्लॉवर यांना कोरोनाची लागण कशी झाली, याचा तपास करावा लागेल.' फ्लॉवर आणि डेटा एनलिस्ट जीटी निरोशन यांच्याशिवाय कोणत्याही खेळाडूला कोरोना झाला नाही. तरीही इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या खेळाडूंना आणखी एका आरटीपीसीआर टेस्टमधून जावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, India Vs Sri lanka