• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजचा टीम इंडियाला कोणताच फायदा नाही, कारण...

IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजचा टीम इंडियाला कोणताच फायदा नाही, कारण...

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) रवाना झाली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याकडे पहिल्यांदाच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

 • Share this:
  कोलंबो, 28 जून: शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) रवाना झाली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याकडे पहिल्यांदाच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. टीमचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे आणि 3 टी-20 मॅच खेळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे, त्याआधी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 सीरिज आहे. वर्ल्ड कपआधीची ही शेवटची सीरिज असल्यामुळे या सीरिजला महत्त्व प्राप्त झालं आहे, पण याचा टीम इंडियाला नक्की किती फायदा होईल, याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. श्रीलंकेच्या टीमने ऑक्टोबर 2019 पासून आत्तापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, यात त्यांना फक्त एकच मॅच जिंकता आली आहे, तर 12 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. श्रीलंकेने यात ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध सीरिज खेळली. एवढच नाही तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मागच्या 20 पैकी फक्त 3 मॅचमध्येच श्रीलंकेला जिंकता आलं. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 19 टी-20 सामने झाले आहेत, यातल्या 13 मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर श्रीलंकेला 5 मॅच जिंकता आल्या, एका सामन्याचा निकाल लागला नाही. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 21 पैकी 13 मॅच जिंकल्या आणि 8 हरल्या, तर न्यूझीलंडने 19 पैकी 10 सामने जिंकले. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीम शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक पहिली वनडे- 13 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता दुसरी वनडे- 16 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता तिसरी वनडे- 18 जुलै- कोलंबो, दुपारी 2.30 वाजता टी-20 सीरिज पहिली टी-20 - 21 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता दुसरी टी-20- 23 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता तिसरी टी-20- 25 जुलै- कोलंबो, संध्याकाळी 7 वाजता
  Published by:Shreyas
  First published: