मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : ट्रिपल धमाक्यानंतर श्रेयससाठी आणखी एक गूड न्यूज, पण विराटला धक्का

IND vs SL : ट्रिपल धमाक्यानंतर श्रेयससाठी आणखी एक गूड न्यूज, पण विराटला धक्का

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 3-0 ने दणदणीत विजय झाला. या सीरिजच्या तिन्ही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) अर्धशतकं केली, याचा फायदा त्याला आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत (T20 Rankings) झाला आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 2 मार्च : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 3-0 ने दणदणीत विजय झाला. या सीरिजच्या तिन्ही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) अर्धशतकं केली, याचा फायदा त्याला आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत (T20 Rankings) झाला आहे. श्रेयस अय्यरने क्रमवारीमध्ये तब्बल 27 स्थानांची मोठी उडी घेतली आहे. पण विराट कोहली (Virat Kohli) टॉप-10 मधून बाहेर झाला आहे. विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली होती. श्रेयस अय्यर क्रमवारीमध्ये 18व्या क्रमांकावर पोहोचला आहे. 27 वर्षांच्या अय्यरने या सीरिजमध्ये 174 च्या स्ट्राईक रेटने 204 रन केले. संपूर्ण सीरिजमध्ये अय्यर एकदाही आऊट झाला नाही.

बॉलिंगमध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) तीन क्रमांक वर 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या पाथुम निसांकाने सीरिजच्या दुसऱ्या सामन्यात 75 रनची खेळी केली, ज्यामुळे त्याला 6 क्रमांचा फायदा झाला, ज्यामुळे तो 9व्या क्रमांकावर पोहोचला. तर विराट कोहलीचं 5 स्थानांचं नुकसान झाल्यामुळे तो 15व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 13व्या क्रमांकावर आहे. टॉप-10 मध्ये बॅटरमध्ये फक्त केएल राहुल हा एकमेव भारतीय आहे जो 10व्या क्रमांकावर आहे. कोणताही भारतीय बॉलर टॉप-10मध्ये नाही. टी-20 क्रमवारीमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

दुसरीकडे टेस्ट क्रिकेटमध्ये कागिसो रबाडानेही मोठी उडी घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टमध्ये रबाडाने चांगली कामगिरी केली, ज्यामुळे तो बॉलरच्या टेस्ट क्रमवारीत 3 स्थान वर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रबाडाने 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 10 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅटर आहे.

First published:

Tags: Icc, India Vs Sri lanka, Shreyas iyer, T20 cricket, Virat kohli