• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs SL : धवनचा वर्ल्ड रेकॉर्ड, हा विक्रम करणारा जगातला पहिलाच खेळाडू!

IND vs SL : धवनचा वर्ल्ड रेकॉर्ड, हा विक्रम करणारा जगातला पहिलाच खेळाडू!

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) विक्रमाला गवसणी घातली आहे.

  • Share this:
    कोलंबो, 18 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्ध सगळ्यात कमी इनिंगमध्ये एक हजार रन पूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड शिखर धवनने केला आहे. धवनने 17 इनिंगमध्येच लंकेविरुद्ध एक हजार रनचा टप्पा ओलांडला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या (Hashim Amla) नावावर हा रेकॉर्ड होता. आमलाने 18 इनिंगमध्ये, सौरव गांगुलीने 20 इनिंगमध्ये तर क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock) 21 इनिंगध्ये श्रीलंकेविरुद्ध एक हजार रन केले होते. धवनचे 6 हजार रन शिखर धवनला वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार रन पूर्ण करण्यासाठी 27 रनची गरज होती. या सामन्यात त्याने 27 वी रन काढताच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार रनचा टप्पाही गाठला. हा रेकॉर्ड करणारा धवन 10 वा भारतीय खेळाडू ठरला. शिखर धवन भारताकडून सगळ्यात जलद 6 हजार रन पूर्ण करणारा दुसरा खेळाडू बनला, त्याने 140 इनिंगमध्ये हे रेकॉर्ड केलं. विराट कोहलीने (Virat Kohli) 136 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले होते. तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. 6 वर्ष 83 दिवसानंतर विराटला 6 हजार रन करता आले होते. विराटनेही श्रीलंकेविरुद्धच 2014 साली हैदराबादमध्ये 6 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 6 हजार रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये धवन चौथा बॅट्समन बनला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमलाने 123 इनिंगमध्ये, विराटने 136 इनिंगमध्ये, केन विलियमसनने 139 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले. विवियन रिचर्ड्स आणि जो रूट यांना हा टप्पा पार करायला 141 इनिंग लागल्या. याशिवाय शिखर धवनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण झाल्या. या सामन्याआधी त्याला हा टप्पा गाठायला 35 रन हवे होते. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 2,315 रन आणि टी-20 मध्ये 1673 रन आहेत.
    Published by:Shreyas
    First published: