कोलंबो, 17 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली पहिली वनडे रविवारी खेळवली जाणार आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडमध्ये असल्यामुळे धवनकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शिखर धवनला नवीन रेकॉर्ड करण्याची संधी आहे. धवनने हे रेकॉर्ड केलं तर तो सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) मागे टाकेल.
धवनने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 5,977 रन केले आहे. या सामन्यात जर त्याला 27 रन करता आल्या तर त्याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार रन होतील. हा रेकॉर्ड करणारा धवन 10 वा भारतीय खेळाडू होईल.
याशिवाय धवनकडे सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. शिखर धवन भारताकडून सगळ्यात जलद 6 हजार रन पूर्ण करणारा दुसरा खेळाडू ठरू शकतो. विराट कोहलीने 136 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले होते. तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. 6 वर्ष 83 दिवसानंतर विराटला 6 हजार रन करता आले होते. विराटनेही श्रीलंकेविरुद्धच 2014 साली हैदराबादमध्ये 6 हजार रनचा टप्पा ओलांडला होता. सध्या या यादीमध्ये सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने 147 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले. यासाठी गांगुलीला 8 वर्ष 289 दिवसांचा वेळ लागला.
धवनने जर पहिल्या वनडेमध्ये 27 रन केले तर त्याला 6 हजार रन पूर्ण करायला 140 इनिंग लागतील. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 6 हजार रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये धवन चौथा बॅट्समन होईल. दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमलाने 123 इनिंगमध्ये, विराटने 136 इनिंगमध्ये, केन विलियमसनने 139 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले. विवियन रिचर्ड्स आणि जो रूट यांना हा टप्पा पार करायला 141 इनिंग लागल्या.
धवनला खुणावत आहेत ही रेकॉर्ड
- 35 वर्ष 225 दिवस : शिखर धवनला पहिल्यांदाच टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आलं आहे. सर्वाधिक वय असताना तो भारतासाठी वनडेमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करेल.
- धवनला वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध 1 हजार रन पूर्ण करायला 17 रनची गरज आहे. श्रीलंकेविरुद्ध सगळ्यात कमी इनिंगमध्ये हजार रन पूर्ण करण्याचा विक्रम धनवच्या नावावर होईल.
- धवनला 10 हजार रन पूर्ण करायला फक्त 35 रनची गरज आहे. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 2,315 रन, वनडेमध्ये 5,977 रन आणि टी-20 मध्ये 1673 रन आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka, Shikhar dhawan, Sourav ganguly