कोलंबो, 13 जुलै : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे आणि टी-20 सीरिजचं नवं वेळापत्रक घोषित करण्यात आलं आहे. खरं तर ही सीरिज 13 जुलै म्हणजेच आजपासून सुरू होणार होती, पण श्रीलंका टीमचे बॅटिंग प्रशिक्षक ग्रॅण्ट फ्लॉवर (Grant Flower) आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे सीरिज पुढे ढकलण्यात आली. आता ही सीरिज 18 जुलैपासून सुरू होणार आहे.
सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं आणि वनडे तसंच टी-20 वेळापत्रक जाहीर केलं. या नव्या वेळापत्रकानुसार आता वनडे मॅच 2.30 ऐवजी 3 वाजता तर टी-20 मॅच रात्री 8 वाजता सुरू होणार आहेत. याआधी टी-20 चे सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होते.
श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह टीमचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी नवोदितांना संधी देण्यात आली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) या टीमचा प्रशिक्षक आहे, तर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.
श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडेमधली पहिली वनडे 18 जुलैला खेळेल. तर 25 जुलैपासून तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. सीरिजच्या सगळ्या मॅच कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्य खेळवल्या जाणार आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीम
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया
नेट बॉलर : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka