मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : सॅमसनने धवनला करायला लावली मोठी चूक, कुलदीपने डोक्याला हात लावला!

IND vs SL : सॅमसनने धवनला करायला लावली मोठी चूक, कुलदीपने डोक्याला हात लावला!

श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये (India vs Sri Lanka) बॅटने संघर्ष करणारा विकेट कीपर संजू सॅमसन (Sanju Samson) खेळपट्टी मागेही अपयशी ठरताना दिसत आहे.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 28 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये बॅटने संघर्ष करणारा विकेट कीपर संजू सॅमसन (Sanju Samson) खेळपट्टी मागेही अपयशी ठरताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 (India vs Sri Lanka) मध्ये संजू सॅमसनचं ऐकून टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) मोठी चूक केली. संजू सॅमसनचं ऐकून शिखर धवनने डीआरएस (DRS) घेतला नाही, पण नंतर रिप्लेमध्ये टीम इंडियाने मोठी चूक केल्याचं निष्पन्न झालं.

आठव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) टाकलेला बॉल श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाच्या (Dasun Shanaka) पॅडला लागला, यानंतर टीम इंडियाने अपील केलं. कुलदीप यादवने शिखर धवनकडे डीआरएस घ्यायचा आग्रह केला. यानंतर धवनने विकेट कीपर असलेल्या संजू सॅमसनला डीआरएसबाबत विचारणा केली, पण त्याने याला नकार दिल्यामुळे धवनने डीआरएस घेतला नाही. रिप्लेमध्ये शनाका आऊट असल्याचं दिसलं आणि कुलदीप यादवने डोक्याला हात लावला.

एकदा जीवनदान मिळालेल्या दासून शनाकाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यानंतर पुढच्याच ओव्हरला कुलदीपने त्याला आऊट केलं. कुलदीपच्या बॉलिंगवर शनाकाने पुढे येऊन शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटलाच बॉल लागला नाही, अखेर संजू सॅमसननेच त्याला स्टम्पिंग केलं. 6 बॉलमध्ये 3 रन करून शनाका आऊट झाला.

डीआरएसमध्ये अनेकवेळा कर्णधार विकेट कीपरचा सल्ला ऐकून निर्णय घेतात, कारण विरोधी टीमचा बॅट्समन आऊट आहे का नाही, हे पाहण्यासाठी विकेट कीपरची जागा सर्वोत्तम मानली जाते. अनेकवेळा विकेट कीपरने दिलेला सल्ला योग्य ठरतो. एमएस धोनी टीम इंडियामध्ये असताना त्याचे डीआरएसचे निर्णय अजिबात चुकायचे नाहीत, त्यामुळे डीआरएसला अनेकवेळा धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हणूनही बोललं जायचं.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Sanju samson, T20 cricket