Home /News /sport /

IND vs SL : राहुल चहरने बाऊंड्री लाईनवर पकडला भन्नाट कॅच, पाहा जबरदस्त VIDEO

IND vs SL : राहुल चहरने बाऊंड्री लाईनवर पकडला भन्नाट कॅच, पाहा जबरदस्त VIDEO

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या राहुल चहरने (Rahul Chahar) आविष्का फर्नांडोचा (Avishka Fernando) भन्नाट कॅच पकडला. राहुल चहरने पकडलेला हा कॅच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    कोलंबो, 28 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचे (India vs Sri Lanka) बॅट्समन अपयशी ठरले. 20 ओव्हरमध्ये भारताला 132 रनच करता आले. एवढ्या कमी आव्हानाचा पाठलाग करताना भारताला चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग करायची गरज होती, त्यामुळे टीमनेही अगदी तशीच कामगिरी केली. बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या राहुल चहरने (Rahul Chahar) आविष्का फर्नांडोचा (Avishka Fernando) भन्नाट कॅच पकडला. राहुल चहरने पकडलेला हा कॅच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvnehswar Kumar) मॅचची तिसरी ओव्हर टाकत होता. तेव्हा ओव्हरच्या चौथ्या बॉलला आविष्का फर्नांडोने डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्क्वेअर लेगला उभा असलेला राहुल चहर धावत कॅच पकडण्यासाठी फाईन लेगच्या दिशेने गेला. कॅच पकडताना तो बाऊंड्री लाईनच्या बाहेर जात होता, पण तेव्हाच त्याने चपळता दाखवत हातातला बॉल हवेत उडवला. यानंतर तो बाऊंड्री लाईनवरून पुन्हा मैदानात आला आणि कॅच पूर्ण केला. 13 बॉलमध्ये 11 रन करून फर्नांडो आऊट झाला. 12 रनवर पहिली विकेट गेल्यानंतर श्रीलंकेने 39 रनवर दुसरी विकेट गमावली. सदीरा समरविक्रमाला 8 रनवर वरूण चक्रवर्तीने बोल्ड केलं. कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले 8 खेळाडू या सीरिजमधून बाहेर झाले आहेत, त्यामुळे टीम इंडियाला उपलब्ध असलेल्या 11 खेळाडूंना मैदानात उतरावं लागलं. या सामन्यात टीम इंडियामध्ये 5 बॅट्समन आणि 6 बॉलर्स आहेत. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), नितीश राणा (Nitish Rana) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) हे आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India Vs Sri lanka, T20 cricket

    पुढील बातम्या