Home /News /sport /

IND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी!

IND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी!

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने (India vs Sri Lanka) वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला, यानंतर आता टी-20 सीरिजवर कब्जा करण्याची संधी आहे. संजू सॅमसनला (Sanju Samson) आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यात अपयश आलं आहे.

पुढे वाचा ...
    कोलंबो, 26 जुलै : श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने (India vs Sri Lanka) वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला, यानंतर आता टी-20 सीरिजवर कब्जा करण्याची संधी आहे. मंगळवारी कोलंबोमध्ये दुसरी टी-20 होणार आहे, या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला, तर त्यांना सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी मिळेल. श्रीलंकेसाठी ही मॅच करो-या-मरो आहे, तर भारतीय बॅट्समनसाठीही ही अखेरची संधी ठरू शकते. संजू सॅमसनला (Sanju Samson) आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यात अपयश आलं आहे. श्रीलंकेचा पहिल्या सामन्यात 38 रनने पराभव केल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये भारतीय टीम बदल करण्याची शक्यता कमी आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी आराम दिला तर मात्र टीममध्ये बदल होऊ शकतो. असं झालं तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. पण दुसऱ्या मॅचसाठी सूर्या आणि पृथ्वी यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. या सामन्यात भारताचा विजय झाला, तर दोघांना तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाईल, असंही बोललं जात आहे. संजू सॅमसनला भारताकडून टी-20 खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला याचं सोनं करता आलं नाही. 8 सामन्यांमध्ये 13.75 च्या सरासरीनेच त्याला रन करता आले आहेत. तसंच टीममध्ये असलेल्या इतर प्रतिभावान खेळाडूंमुळेही संजू सॅमसनसाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. ऋषभ पंतने संजू सॅमसनला खूप पिछाडीवर टाकलं आहे, तर इशान किशननेही मिळालेल्या मर्यादित संधींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाकडे याशिवाय केएल राहुलचाही विकेट कीपर म्हणून पर्याय आहे, त्यामुळे संजू सॅमसनकडे आता फार संधी शिल्लक नाहीत. आता उरलेल्या दोन सामन्यांमध्ये संजू सॅमसनला मोठा स्कोअर करता आला नाही, तर ही त्याच्यासाठी अखेरची संधी ठरू शकते. पांड्याचा फॉर्म चिंतेचा विषय टीमसाठी हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फॉर्म चिंतेचा विषय आहे. पाठीवरच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिकने ठिकठाक बॉलिंग केली, पण बॅटिंगमध्ये मात्र त्याला फार प्रभाव पाडता आला नाही. भारतीय टीम शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya, India Vs Sri lanka, Sanju samson, T20 cricket

    पुढील बातम्या