मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'संजू सॅमसन आळशी बॅट्समन', पाकिस्तानच्या 'फिक्सर' खेळाडूची टीका

'संजू सॅमसन आळशी बॅट्समन', पाकिस्तानच्या 'फिक्सर' खेळाडूची टीका

श्रीलंका दौऱ्याहून टीम इंडिया (India vs Sri Lanka) भारतात आली आहे. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवल्यानंतर टी-20 सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने पराभव झाला. खेळपट्टीही कठीण असल्यामुळे अनुभव नसलेल्या भारतीय बॅट्समनना स्वत:ला सिद्ध करता आलं नाही. यामध्ये संजू सॅमसनचं (Sanju Samson) नावही आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑगस्ट : श्रीलंका दौऱ्याहून टीम इंडिया (India vs Sri Lanka) भारतात आली आहे. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवल्यानंतर टी-20 सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने पराभव झाला. कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक खेळाडू अखेरच्या 2 टी-20 मध्ये खेळू शकले नाहीत, तसंच खेळपट्टीही कठीण असल्यामुळे अनुभव नसलेल्या भारतीय बॅट्समनना स्वत:ला सिद्ध करता आलं नाही. यामध्ये संजू सॅमसनचं (Sanju Samson) नावही आहे. सॅमसनला तिन्ही टी-20 मध्ये खेळण्याची संधी मिळाली, पण तो तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला. संजूची कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे त्याच्यावर आता टीका होऊ लागली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) यानेही संजू सॅमसनवर टीका केली आहे. तसंच त्याने संजू सॅमसनच्या तंत्रातल्या चुकाही बटने सांगितल्या.

'संजू सॅमसन मला आळशी बॅट्समन वाटला. जेव्हा आपल्याला हसरंगाचा बॉल कळत नाही, तेव्हा तुम्ही पाय बॅटच्या पुढे ठेवला पाहिजे. पण तरीही संजू सॅमसनने हसरंगाला बॅकफूटवर खेळण्याचा प्रयत्न केला. लाईनमधून हटून त्याने खेळायला पाहिजे होतं. याच कारणामुळे संजू सॅमसन बॉल खेळण्यात चुकला आणि LBW आऊट झाला,' असं सलमान बट म्हणाला.

'मला संजू सॅमसन बेजबाबदार वाटला. टीममध्ये फक्त 5 बॅट्समन आहेत हे तुम्हाला माहिती होतं, त्यात तुमच्या एक-दोन विकेट गेल्या होत्या,' अशी प्रतिक्रिया सलमान बटने दिली.

संजू सॅमसनने 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 34 रन केले, यातल्या अखेरच्या सामन्यात तो शून्य रनवर आऊट झाला. वनडेच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 46 रनची खेळी केली, पण खराब शॉट मारून तो आऊट झाला. सीरिज संपल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) संजू सॅमसनला पाठिंबा दिला. तो युवा आहे, यातून तो नक्की शिकेल. सीरिजमधली कामगिरी बघून तोदेखील निराश झाला असेल, असं वक्तव्य राहुल द्रविडने केलं.

स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याप्रकरणी सलमान बट याच्यावर आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली. याप्रकरणी त्याला जेलची हवादेखील खावी लागली. 2010 साली लॉर्ड्सवर झालेल्या इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातल्या टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग झालं. याप्रकरणी सलमान बट, मोहम्मद आसीफ (Mohammad Asif) आणि मोहम्मद आमीर (Mohammad Amir) दोषी आढळले. यातल्या आसीफ आणि बट यांच्यावर आजीवन तर मोहम्मद आमीरवर 5 वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Sanju samson