मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

राहुल द्रविडला श्रीलंकेने दिला त्रास, कोच होताच परतफेड करणार!

राहुल द्रविडला श्रीलंकेने दिला त्रास, कोच होताच परतफेड करणार!

राहुल द्रविडला (Rahul Dravid) टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखलं जातं. द्रविड म्हणजे असा बॅट्समन ज्याच्या तंत्राला भेदणं जवळपास अशक्य होतं. तो जर क्रीजवर सेट झाला तर जगातल्या कोणत्याही बॉलरला त्याची विकेट काढणं जमायचं नाही.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 29 जून : राहुल द्रविडला (Rahul Dravid) टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखलं जातं. द्रविड म्हणजे असा बॅट्समन ज्याच्या तंत्राला भेदणं जवळपास अशक्य होतं. तो जर क्रीजवर सेट झाला तर जगातल्या कोणत्याही बॉलरला त्याची विकेट काढणं जमायचं नाही. आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये द्रविडने संपूर्ण जगात रन केले, पण श्रीलंकेमध्ये मात्र त्याला संघर्ष करावा लागला. श्रीलंकेनं (Sri Lanka) राहुल द्रविडला चांगल्या आठवणी देण्यापेक्षा कटू क्षणच जास्त दिले.

श्रीलंकेमधले राहुल द्रविडचे आकडे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. टेस्टमध्ये 50 पेक्षा जास्तच्या सरासरीने खेळणारा द्रविड श्रीलंकेत फक्त एकच शतक करू शकला आहे. द्रविडने श्रीलंकेत 12 टेस्टमध्ये 33.10 च्या सरासरीने 662 रन केले, यात एक शतक आणि 4 अर्धशतकं आहेत. 1999 साली त्याने कोलंबोमध्ये 107 रनची खेळी केली होती, यानंतर त्याला श्रीलंकेत शतक करता आलं नाही. द्रविडने लंकेत शेवटची टेस्ट 2010 साली खेळली. 11 वर्षांपर्यंत द्रविडचा लंकेत शतक करण्याचा दुष्काळ कायम राहिला.

वनडे क्रिकेटमध्ये द्रविडने 10,889 रन केले यात 12 शतकं होती, पम यातलं एकही शतक श्रीलंकेविरुद्ध नव्हतं. या टीमविरुद्ध द्रविडने 22 इनिंगमध्ये 38.63 च्या सरासरीने 734 रन केले, यात 5 अर्धशतकांचा समावेश होता. श्रीलंकेविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 66 चा होता. 2007 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडिया पहिल्या राऊंडमध्येच बाहेर झाली, त्यावेळीही श्रीलंकेनेच टीम इंडियाचा पराभव केला होता आणि योगायोग म्हणजे द्रविड तेव्हा टीमचा कर्णधार होता.

राहुल द्रविड आता प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेत पोहोचला आहे. भूतकाळातल्या सगळ्या पराभवांची आणि वाईट कामगिरीची परतफेड करण्याची संधी राहुल द्रविडकडे आहे. टीममधल्या युवा खेळाडूंना तो आपल्याला लंकेत आलेल्या अपयशातून नक्कीच काहीतरी शिकवेल.

First published:

Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid, Team india