मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : फेवरेट खेळाडूचा फ्लॉप शो, द्रविड म्हणतो, 'तोदेखील निराश असेल'

IND vs SL : फेवरेट खेळाडूचा फ्लॉप शो, द्रविड म्हणतो, 'तोदेखील निराश असेल'

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा (India vs Sri Lanka) संपला आहे. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय झाल्यानंतर टी-20 सीरिजमध्ये भारताला 2-1 ने पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाच्या कामगिरीवर भाष्य केलं

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 जुलै : टीम इंडियाचा श्रीलंका दौरा (India vs Sri Lanka) संपला आहे. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय झाल्यानंतर टी-20 सीरिजमध्ये भारताला 2-1 ने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे या टीममध्ये नवोदितांना संधी देण्यात आली. खराब बॅटिंग आणि पर्यायच उपलब्ध नसल्यामुळे टीमने अखेरच्या दोन टी-20 मॅच गमावल्या. टी-20 सीरिजमधल्या भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण कोरोना व्हायरसही ठरलं. कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोना झाल्यामुळे त्याच्यासह संपर्कात आलेले 9 खेळाडू अखेरच्या दोन टी-20 मधून बाहेर झाले.

20 पैकी 9 खेळाडू सीरिजमधून बाहेर झाल्यामुळे टीम इंडियाला उरलेले 11 खेळाडू खेळवण्यावाचून गत्यंतर नव्हतं. या कारणामुळे टीमचं संतुलनही बिघडलं. फक्त 5 बॅट्समन आणि 6 बॉलर घेऊन भारतीय टीम मैदानात उतरली.

श्रीलंका दौऱ्यामध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) आणि मनिष पांडे (Manish Pandey) या दोन खेळाडूंनी सर्वाधिक निराशा केली. यापुढे त्यांना टीम इंडियामध्ये संधीही मिळेल का नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने संजू सॅमसनचा बचाव केला आहे. संजू सॅमसनलाही त्याची ही कामगिरी पाहून दु:ख झालं असेल, असं द्रविड म्हणाला आहे.

'खेळपट्टी बॅट्समनसाठी सोपी नव्हती. वनडेमध्ये सॅमसनने 46 रन केले, पहिल्या टी-20 मध्येही तो चांगला खेळला, पण अखेरच्या दोन सामन्यांमध्ये बॅटिंग करणं कठीण होतं. तुम्ही सीरिजकडे बघितलंत तर निराश नक्कीच व्हाल. संजू सॅमसनसह टीममधले दुसरे खेळाडूही उत्कृष्ट आहेत, त्यांना वेळ द्यावा लागेल,' असा सल्ला द्रविडने दिला.

संजू सॅमसनला श्रीलंकेविरुद्धच्या 3 टी-20 मॅचमध्ये फक्त 34 रनच करता आले. तिसऱ्या टी-20 मध्ये तो शून्य रनवर आऊट झाला. मोठ-मोठे सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संजू सॅमसनला श्रीलंकेच्या स्पिनर्ससमोर खेळताना अडचणींचा सामना करावा लागला.

'मला बॅट्समनच्या कामगिरीबाबत अजिबात निराशा नाही, कारण ते अजून युवा आहेत. कठीण परिस्थितीमध्ये चांगल्या बॉलिंगचा सामना केला तरच ते शिकू शकतात. श्रीलंकेचे बॉलर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत,' अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने दिली.

भारताकडून 10 टी-20 खेळणाऱ्या संजू सॅमसनने फक्त 11.70 च्या सरासरीने 117 रन केले. त्याचा स्ट्राईक रेटही 110 चा आहे. या कामगिरीमुळे संजू सॅमसनला टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) टीममध्ये संधी मिळणं अशक्य झालं आहे.

संजू सॅमसन हा राहुल द्रविडच्या आवडत्या खेळाडूपैकी एक आहे. आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) ट्रायलला आला असताना राहुल द्रविडने संजू सॅमसनला आपल्या टीमकडून खेळशील का? अशी विचारणा केली होती. यानंतर इंडिया-एकडून खेळताना राहुल द्रविड टीमचा प्रशिक्षक होता, तर संजू सॅमसन टीममध्ये होता.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Rahul dravid, Sanju samson