मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : 'पराभवाने फरक पडत नाही, पण...' सीरिज जिंकल्यावर द्रविडची पहिली प्रतिक्रिया

IND vs SL : 'पराभवाने फरक पडत नाही, पण...' सीरिज जिंकल्यावर द्रविडची पहिली प्रतिक्रिया

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) रोमांचक विजय झाला. या विजयानंतर टीमचा कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) ड्रेसिंग रूममध्ये युवा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी भाषण केलं. बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला हा व्हिडिओ शेयर केला आहे.

पुढे वाचा ...

कोलंबो, 21 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) रोमांचक विजय झाला. या विजयानंतर टीमचा कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) ड्रेसिंग रूममध्ये युवा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी भाषण केलं. बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधला हा व्हिडिओ शेयर केला आहे, या व्हिडिओमध्ये द्रविड खेळाडूंना संबोधित करत आहे. 'श्रीलंकेचा 3 विकेटने पराभव करणं एक शानदार कामगिरी होती. पण भारताने हा साना गमावला असता, तरी मला काहीच अडचण नव्हती. टीमने अखेरपर्यंत लढत दिली, ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं,' असं द्रविड म्हणाला.

'मॅचचा निकाल बघितला तर आपण योग्य ठिकाणी आहोत. हा विजय अविश्वसनीय आणि शानदार आहे, पण आपण मॅच हरलो असतो तरी केलेला संघर्ष उत्कृष्ट होता,' अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने दिली.

दीपक चहरच्या (Deepak Chahar) जबरदस्त बॅटिंगच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 3 विकेटने पराभव केला. चहरने नाबाद 69 रनची खेळी केली. भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) 19 रनची खेळी करून चहरला चांगली साथ दिली. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 84 रनची पार्टनरशीप झाली. यामुळे भारताने सीरिजमध्ये 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे.

'ही वेळ वैयक्तिक कामगिरीवर बोलण्याची नाही, याबाबत आपण बैठकीमध्ये बोलू, जेव्हा प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं जाईल. पण जर संपूर्ण मॅच बघितली तर टीमची कामगिरी सर्वोत्तम झाली. बॉलर्समध्ये अनेकांचं प्रदर्शन चांगलं होतं,' असं वक्तव्य द्रविडने केलं.

'श्रीलंका पुनरागमन करेल, त्यामुळे विरोधी टीमचा सन्मान कराल असं आपलं बोलणं झालं होतं. तीदेखील आंतरराष्ट्रीय टीम आहे. श्रीलंकेने पुनरागमन केलं, पण आपण चॅम्पियन टीमप्रमाणे खेळलो,' असं द्रविडने सांगितलं. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरने आपले अनुभव सांगितले.

मॅचमध्ये 53 रनची खेळी करणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला, 'माझ्याकडे शब्द नाहीत, मी खेळलेल्या सर्वोत्तम मॅचपैकी ही एक मॅच होती. हा विजय अविश्वसनीय होता. भुवी आणि दीपकच्या बॅटिंगबाबत अनेकवेळा बोललं जातं, पण आज त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं, हा संपूर्ण टीमचा प्रयत्न होता.'

'प्रत्येकवेळा बॉलिंग केल्यानंतर आम्हाला बॅटिंगची संधी मिळत नाही. 50 ओव्हर फिल्डिंग केल्यानंतर जवळपास 25 ओव्हर बॅटिंग केली, यामुळे चांगलं वाटलं,' असं वक्तव्य दीपक चहरने केलं.

First published:
top videos

    Tags: India Vs Sri lanka, Rahul dravid