IND vs SL : पृथ्वी-इशानला ब्रेक? तिसऱ्या वनडेमध्ये हे खेळाडू मैदानात उतरणार!

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजची तिसरी मॅच (Third ODI) शुक्रवारी होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे आता श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजची तिसरी मॅच (Third ODI) शुक्रवारी होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे आता श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.

  • Share this:
    कोलंबो, 22 जुलै : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजची तिसरी मॅच (Third ODI) शुक्रवारी होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे आता श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. या सामन्यासाठी भारतीय टीममध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या सामन्यातून ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि विकेट कीपर इशान किशन (Ishan Kishan) यांना विश्रांती दिली जाऊ शकते. शॉ आणि किशन यांनी पहिल्या सामन्यात आक्रमक बॅटिंग केली होती, पण दुसऱ्या मॅचमध्ये दोघंही खराब शॉट खेळून आऊट झाले होते. इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार अखेरच्या सामन्यात पृथ्वी शॉऐवजी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) किंवा देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, तर इशान किशनऐवजी (Ishan Kishan) संजू सॅमसनला (Sanju Samson) खेळवलं जाऊ शकतं. तीन टी-20 मॅचच्या सीरिजआधी टीम इंडियाचा पृथ्वी शॉला आराम देण्याचा विचार आहे. संजू सॅमसन पहिल्या दोन वनडेमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, पण आता तो पूर्णपणे फिट आहे. इशान किशनला बाहेर बसवलं तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर तर संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर खेळेल, असंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे. पहिल्या दोन वनडेमध्ये अपयशी ठरलेला मनिष पांडे (Manish Pandey) चौथ्या क्रमांकावरच खेळेल. हार्दिक पांड्याचा फिटनेस टीम इंडियासाठी चिंतेचं कारण आहे, कारण दुसऱ्या वनडेमध्ये बॉलिंग करताना पांड्याची कंबर दुखत होती. बॅटिंग करताना त्याला एकही रन काढता आली नव्हती. याशिवाय भारतीय टीममध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. भारताची संभाव्य टीम शिखर धवन, देवदत्त पडिक्कल/ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दीपक चहर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार
    Published by:Shreyas
    First published: