Home /News /sport /

IND vs SL : नवे खेळाडू शोधण्याच्या नादात दोघांच्या करियरला ब्रेक लावणार श्रीलंका दौरा!

IND vs SL : नवे खेळाडू शोधण्याच्या नादात दोघांच्या करियरला ब्रेक लावणार श्रीलंका दौरा!

भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे नवोदितांना श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) संधी देण्यात आली. श्रीलंकेमध्ये गेलेल्या 20 खेळाडूंपैकी 18 जणांना खेळण्याची संधी मिळाली, यातल्या दोघांनी निराशाजनक कामगिरी केली.

पुढे वाचा ...
    कोलंबो, 27 जुलै : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात दुसरा टी-20 सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवल्यानंतर आता टी-20 सीरिजमध्येही विजयी आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे नवोदितांना श्रीलंका दौऱ्यासाठी संधी देण्यात आली. श्रीलंकेमध्ये गेलेल्या 20 खेळाडूंपैकी 18 जणांना खेळण्याची संधी मिळाली, तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) अजूनही खेळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. श्रीलंका दौरा म्हणजे या नवोदितांना शोधण्याची आणि त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असल्याचं बोललं गेलं, पण नवे खेळाडू शोधण्याच्या नादात भारताच्या दोन खेळाडूंचं करियरच धोक्यात आलं आहे. मनिष पांडे (Manish Pandey) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांना टीमकडून अनेकवेळा संधी मिळाली, पण त्यांना स्वत:चं स्थान पक्कं करता आलं नाही. मनिष पांडे फ्लॉप मिडल ऑर्डरचा बॅट्समन असलेल्या मनिष पांडेला वनडे सीरिजमध्ये चांगली कामगिरी करत टीममध्ये जागा निश्चित करण्याची मोठी संधी होती, पण पांडे यामध्ये अपयशी ठरला. त्याने तीन सामन्यात 34 रनच करता आले. पहिल्या दोन सामन्यातील अपयशानंतरही त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, मात्र तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला, यामुळे आता त्याला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मनिष पांडेनं 28 वन-डे सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकासह 555 रन केले आहेत. तर 39 टी 20 सामन्यांमध्ये 126.15 च्या स्ट्राईक रेटनं 709 रन केले आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असतील त्यावेळी आता पांडेला संधी मिळण्याची शक्यता अवघड आहे. संजू सॅमसनही अपयशी दुसरीकडे संजू सॅमसनलाही पुढच्या दोन टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली नाही तर टीमबाहेर जावं लागू शकतं. संजू सॅमसनला (Sanju Samson) आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यात अपयश आलं आहे. संजू सॅमसनला भारताकडून टी-20 खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला याचं सोनं करता आलं नाही. 8 सामन्यांमध्ये 13.75 च्या सरासरीनेच त्याला रन करता आले आहेत. तसंच टीममध्ये असलेल्या इतर प्रतिभावान खेळाडूंमुळेही संजू सॅमसनसाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. ऋषभ पंतने संजू सॅमसनला खूप पिछाडीवर टाकलं आहे, तर इशान किशननेही मिळालेल्या मर्यादित संधींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाकडे याशिवाय केएल राहुलचाही विकेट कीपर म्हणून पर्याय आहे, त्यामुळे संजू सॅमसनकडे आता फार संधी शिल्लक नाहीत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Sanju samson

    पुढील बातम्या