Home /News /sport /

IND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हे आहे कारण

IND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हे आहे कारण

टीम इंडियाचा ऑल राऊंडर कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत-श्रीलंका यांच्यातली (India vs Sri Lanka) दुसरी टी-20 मॅच पुढे ढकलण्यात आली आहे.

    कोलंबो, 27 जुलै : टीम इंडियाचा ऑल राऊंडर कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत-श्रीलंका यांच्यातली (India vs Sri Lanka) दुसरी टी-20 मॅच पुढे ढकलण्यात आली आहे. इतर खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तर हा सामना बुधवारी खेळवला जाऊ शकतो. कृणाल पांड्याला कोरोना झाला असला, तरी त्याचे धक्के इंग्लंडमध्ये बसले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs England) दुखापतींनी ग्रासलं आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill), आवेश खान (Avesh Khan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हे दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर असलेले पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना तिसरी टी-20 झाल्यानंतर इंग्लंडला पाठवण्यात येणार होतं, पण आता हे दोघंही कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यामुळे टीम इंडियापुढचं संकट वाढलं आहे. 29 तारखेला तिसरी टी-20 झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ इंग्लंडला रवाना होणार होते, यानंतर त्यांना इंग्लंडमध्ये 10 दिवस नियमांनुसार क्वारंटाईन व्हावं लागणार होतं. आता इंग्लंडला जाण्याआधी या दोघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येणं गरजेचं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, India vs england, India Vs Sri lanka, Krunal Pandya

    पुढील बातम्या