मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : टीम इंडियाची 'कमजोरी', झिम्बाब्वेपेक्षाही खराब कामगिरी

IND vs SL : टीम इंडियाची 'कमजोरी', झिम्बाब्वेपेक्षाही खराब कामगिरी

टीम इंडियाने रविवारी श्रीलंका (India vs Sri Lanka) दौऱ्याची सुरुवात केली आहे. पहिल्या वनडेमध्ये 10 ओव्हर खेळून श्रीलंकेने 1 विकेट गमावत 55 रन केले, म्हणजेच पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाला फक्त एकच विकेट घेता आली.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 18 जुलै : टीम इंडियाने रविवारी श्रीलंका (India vs Sri Lanka) दौऱ्याची सुरुवात केली आहे. पहिल्या वनडेमध्ये 10 ओव्हर खेळून श्रीलंकेने 1 विकेट गमावत 55 रन केले, म्हणजेच पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाला फक्त एकच विकेट घेता आली. वनडेतल्या टॉप-11 टीममधली ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे आणि तीन टी-20 मॅच खेळणार आहेत. शिखर धवनकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

जानेवारी 2020 पासून आतापर्यंत टॉप-11 टीमचं रेकॉर्ड बघितलं तर टीम इंडियाला पहिल्या 10 ओव्हरमध्ये फक्त 7 विकेट घेता आल्या आहेत, यात भारतीय बॉलर्सची सरासरी 100 पेक्षा जास्त आणि इकॉनॉमी 6 पेक्षा जास्त आहे. सरासरीच्या हिशोबाने टीम इंडियाची ही कामगिरी सगळ्यात वाईट आहे. झिम्बाब्वेने 59 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या, तसंच त्यांचा इकोनॉमी रेट 5 च्या जवळपास आहे. दक्षिण आप्रिकेने 47 च्या. श्रीलंकेने 46, वेस्ट इंडिजने 44 च्या सरासरीने बॉलिंग केली. पॉवर प्लेमध्ये श्रीलंकेला 12 विकेट मिळाल्या.

न्यूझीलंडची कामगिरी सर्वोत्तम

जानेवारी 2020 पासून न्यूझीलंडच्या बॉलर्सची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. किवी टीमने 24 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या. पहिल्या 10 ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आयर्लंडच्या नावावर आहे. आयर्लंडने पॉवर प्लेमध्ये 24 विकेट घेतल्या. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टीममध्ये टीम इंडिया 9 व्या क्रमांकावर आहे. भारतीय टीम फक्त झिम्बाब्वे (6 विकेट) आणि अफगाणिस्तान (6 विकेट) यांच्याच पुढे आहे.

जानेवारी 2020 पासून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) टॉपवर आहे. शार्दुलने 8 मॅचमध्ये 14 विकेट घेतल्या. जानेवारी 2020 पासून भारताची कामगिरीही खराब झाली. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचआधी भारताने 12 वनडेपैकी फक्त 5 मॅच जिंकल्या, तर 7 सामन्यांमध्ये टीमला पराभव पत्करावा लागला.

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka