• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: ऑस्ट्रेलियात दोन्ही वेळा बोल्ड झाल्यावर पृथ्वी शॉने असा बदलला खेळ, द्रविडने केली मदत

IND vs SL: ऑस्ट्रेलियात दोन्ही वेळा बोल्ड झाल्यावर पृथ्वी शॉने असा बदलला खेळ, द्रविडने केली मदत

टीम इंडियाचा आक्रमक ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 2021 मध्ये धमाका करत आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) आणि आयपीएलनंतर (IPL) आता श्रीलंका दौऱ्यातल्या पहिल्या वनडेमध्ये (India vs Sri Lanka) पृथ्वी शॉने आपली विस्फोटक बॅटिंग कायम ठेवली.

 • Share this:
  कोलंबो, 19 जुलै: टीम इंडियाचा आक्रमक ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 2021 मध्ये धमाका करत आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) आणि आयपीएलनंतर (IPL) आता श्रीलंका दौऱ्यातल्या पहिल्या वनडेमध्ये (India vs Sri Lanka) पृथ्वी शॉने आपली विस्फोटक बॅटिंग कायम ठेवली. त्याने 24 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीने 43 रन केले. टीम इंडियामध्ये दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर आता शॉने या संधीचं सोनं करणार असल्याचे संकेत दिले आहेत. सात महिन्यांआधी ऍडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) दोन्ही इनिंगमध्ये बोल्ड झाल्यानंतर शॉला टीममधून बाहेर करण्यात आलं. यानंतर पृथ्वी शॉला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (WTC Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठीही संधी देण्यात आली नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये मात्र त्याने बरेच रन केले. पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 165.40 च्या सरासरीने 827 रन केले, यात त्याचा स्ट्राईक रेट 138.29 एवढा होता. याशिवाय शॉने आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्लीकडून 8 मॅचमध्ये 308 रन ठोकले. 166 च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली, यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीममधून डच्चू मिळाल्याने शॉला आपल्या तंत्राबाबत चिंता निर्माण झाली होती. आपण वारंवार बोल्ड का होत आहोत? हे त्याला समजत नव्हतं. पृथ्वी शॉला त्याची ही कमजोरी दूर करायची होती. एका मुलाखतीमध्ये शॉने याबाबत सांगितलं. 'मी ऑस्ट्रेलियामध्येच यावर काम करायला सुरुवात केली. मला बॅटला शरिराजवळ ठेवण्याची गरज होती. जे मी करत नव्हतो. मी बॅटिंग करताना हालचालीवर नियंत्रण मिळवलं. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर मी कोच प्रशांत शेट्टी सर आणि प्रविण आमरे सरांसोबत चर्चा केली. विजय हजारे ट्रॉफी खेळताना, त्यांच्यासोबत नेटमध्ये काम केलं. त्यांच्या सल्ल्यानंतर बॅटिंगमध्ये थोडासा बदल केला आणि माझा नैसर्गिक खेळ खेळला,' असं शॉ म्हणाला. 'राहुल द्रविड (Rahul Dravid) सरांनी मला कधीच बॅटिंगमध्ये बदल न करण्याचा सल्ला दिला नाही. त्यांनी कधीच गोष्टी आमच्यावर थोपवल्या नाहीत किंवा बदलायचा प्रयत्न केला नाही. ते नेहमी नैसर्गिक खेळ करायला सांगायचे. कारण मी पॉवरप्लेमध्ये खेळलो, तर टीमला याची मदत मिळेल, हे त्यांना माहिती होतं. द्रविड सरांनी कधीच मला स्वत:चा खेळ खेळण्यापासून रोखलं नाही,' असं वक्तव्य पृथ्वी शॉने केलं.
  Published by:Shreyas
  First published: