मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: द्रविड-धवन तिघांना देणार पदार्पणाची संधी, अनुभवी खेळाडू बाहेर!

IND vs SL: द्रविड-धवन तिघांना देणार पदार्पणाची संधी, अनुभवी खेळाडू बाहेर!

श्रीलंकेला वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता भारतीय टीम (India vs Sri Lanka) टी-20 सीरिज जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सीरिजचा (T20 Series) पहिला सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

श्रीलंकेला वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता भारतीय टीम (India vs Sri Lanka) टी-20 सीरिज जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सीरिजचा (T20 Series) पहिला सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

श्रीलंकेला वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता भारतीय टीम (India vs Sri Lanka) टी-20 सीरिज जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सीरिजचा (T20 Series) पहिला सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 25 जुलै: श्रीलंकेला वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता भारतीय टीम (India vs Sri Lanka) टी-20 सीरिज जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सीरिजचा पहिला सामना रविवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakrawarthy) संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये (IPL) वरुणने आपल्या स्पिनने अनेक दिग्गजांना फसवलं आहे. ऑफ ब्रेक, कॅरम बॉल, लेग ब्रेक असे बॉल वरुण चक्रवर्तीच्या ताफ्यात आहेत.

खराब फिटनेस आणि दुखापतीमुळे वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाता आलं नव्हतं. इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजमध्येही वरुण फिटनेसमुळेच खेळू शकला नव्हता. युएईमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधी भारतीय टीम वरुणसारख्याच मिस्ट्री स्पिनरच्या शोधात आहे, त्यामुळे या 29 वर्षांच्या बॉलरला पहिल्या टी-20 मध्ये संधी मिळू शकते.

वरुण चक्रवर्तीशिवाय देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनाही पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांनी आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडला पाठवलं जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे टीम मॅनेजमेंट पडिक्कल आणि गायकवाड या दोघांना मैदानात उतरवू शकते.

इशान किशन आणि संजू सॅमसन यांना अंतिम-11 मध्ये खेळवलं जाईल, हे जवळपास निश्चित आहे. तर खराब फॉर्ममध्ये असलेल्या मनिष पांडेला (Manish Pandey) बाहेर बसावं लागेल. हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंची निवडही निश्चित मानली जात आहे. तिसऱ्या वनडेमध्ये भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरला आराम देण्यात आला होता, यानंतर आता हे दोघं पुन्हा खेळण्यासाठी तयार आहेत. स्पिनर म्हणून वरुण चक्रवर्तीसोबत कृणाल पांड्या आणि युझवेंद्र चहल असेल.

श्रीलंकेने भारताविरुद्ध आपल्या जमिनीवर 9 वर्षांनंतर विजय मिळवला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही द्विगुणीत झाला असेल.

भारतीय टीम

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया

श्रीलंकन टीम

दासून शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, आविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसंका, चरित असलंका, वनिन्दु हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरु उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुष्मंथा संदकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रविण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसून रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उडाना

First published:

Tags: India Vs Sri lanka, T20 cricket