• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL, 1st T20: भारत-श्रीलंका मॅचचं Live Streaming, कधी, कुठे पाहाल?

IND vs SL, 1st T20: भारत-श्रीलंका मॅचचं Live Streaming, कधी, कुठे पाहाल?

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 2-1 ने विजय झाला. यानंतर आता टी-20 सीरिजला (T20 Series) रविवारपासून सुरुवात होत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी टीम इंडियाची ही अखेरची टी-20 सीरिज आहे.

 • Share this:
  कोलंबो, 25 जुलै: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 2-1 ने विजय झाला. यानंतर आता टी-20 सीरिजला (T20 Series) रविवारपासून सुरुवात होत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधी टीम इंडियाची ही अखेरची टी-20 सीरिज आहे, त्यामुळे कर्णधार शिखर धवन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या सीरिजसाठी नवोदितांना संधी द्यायची शक्यता आहे. टीम इंडिया टी-20 मधली दुसरी सगळ्यात यशस्वी टीम आहे, तर श्रीलंकेचं या फॉरमॅटमधलं रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. श्रीलंकेने सर्वाधिक 71 टी-20 मॅच हरल्या आहेत, त्यामुळे टीम इंडियाला ही सीरिज फारशी कठीण जाणार नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातली पहिली टी-20 मॅच रविवार 25 जुलैला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होईल. भारत-श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या टी-20 सामन्याचं प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. याशिवाय सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) सोनी लिव वरही पाहता येणार आहे. भारतीय टीम शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया श्रीलंकन टीम दासून शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, आविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसंका, चरित असलंका, वनिन्दु हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरु उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुष्मंथा संदकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रविण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसून रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उडाना
  Published by:Shreyas
  First published: