मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू वनडेमध्ये पदार्पण करणार, शिखर धवनने केलं स्पष्ट

IND vs SL : मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू वनडेमध्ये पदार्पण करणार, शिखर धवनने केलं स्पष्ट

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजला रविवार 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी (ODI Series) टीम इंडियाने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. जे पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळताना दिसतील.

कोलंबो, 17 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजला रविवार 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. जे पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळताना दिसतील, यातलं एक नाव म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार असल्याचं टीमचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने स्पष्ट केलं आहे. सूर्यकुमार यादव इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये टी-20 मॅच खेळला, पण त्याला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. आता श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधून तो वनडे क्रिकेटमध्येही पाऊल ठेवेल.

वनडे सीरिजआधी झालेल्या पत्रकार परिषदेत शिखर धवन याने सूर्यकुमार वनडे सीरिज खेळेल, असं सांगितलं आहे. 'आम्ही टीम निश्चित केली आहे, याचा खुलासा रविवारी केला जाईल. सूर्यकुमार यादव उत्कृष्ट खेळाडू आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने शानदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण करत त्याने स्वत:ला सिद्ध केलं. या सीरिजमध्येही तो सर्वोत्तम कामगिरी करेल, याचा मला विश्वास आहे,' असं धवन म्हणाला.

शिखर धवनने टीममधल्या युवा खेळाडूंचं कौतुक केलं, तसंच त्यांना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्याने केली. 'ही वनडे सीरिज आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आमची टीम खूप तरुण आहे. प्रत्येक खेळाडूला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, यामुळे ते आपलं टॅलेंट दाखवू शकतात,' अशी प्रतिक्रिया धवनने दिली.

सूर्यकुमार यादवचं लिस्ट ए मधलं रेकॉर्ड दमदार आहे. 98 मॅचमध्ये त्याने 37.55 च्या सरासरीने 2,779 रन केले आहेत, यामध्ये 3 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 100 पेक्षा जास्त आहे. सूर्यकुमार यादवने त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-20 इनिंगमध्ये अर्धशतक केलं होतं.

पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य टीम

शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर

First published:
top videos

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Shikhar dhawan, Suryakumar yadav