• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL : टीम इंडियाने श्रीलंकेला धुतलं, पहिल्या वनडेमध्ये दणदणीत विजय

IND vs SL : टीम इंडियाने श्रीलंकेला धुतलं, पहिल्या वनडेमध्ये दणदणीत विजय

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. श्रीलंकेने ठेवलेल्या 263 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 36.4 ओव्हरमध्येच 3 विकेट गमावून केला. कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) 95 बॉलमध्ये 86 रनवर नाबाद राहिला.

 • Share this:
  कोलंबो, 18 जुलै: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा  (India vs Sri Lanka) 7 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. श्रीलंकेने ठेवलेल्या 263 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 36.4 ओव्हरमध्येच 3 विकेट गमावून केला. कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) 95 बॉलमध्ये 86 रनवर नाबाद राहिला. आपली पहिलीच वनडे मॅच खेळणाऱ्या इशान किशनने (Ishan Kishan) 42 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 20 बॉलमध्ये 31 रनची नाबाद खेळी केली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 43 रनवर आणि मनिष पांडे (Manish Pandey) 26 रनवर आऊट झाले. श्रीलंकेकडून धनंजया डि सिल्वाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या आणि लक्षण संदकनला एक विकेट घेण्यात यश आलं. या विजयासोबतच 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या बॅट्समननी अखेरच्या दोन ओव्हरमध्ये फटकेबाजी केली, त्यामुळे त्यांना 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 262 रन पर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेने शेवटच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) 19 रन मारल्या, यात दोन सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. तर त्याआधी हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकलेल्या 49 व्या ओव्हरमध्ये लंकेने 13 रन काढले. चामिका करुणारत्ने 35 बॉलमध्ये 43 रनवर नाबाद राहिला. करुणारत्ने यानेच या सामन्यात सर्वाधिक स्कोअर केला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर आविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी टीमला 49 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. श्रीलंकेच्या बहुतेक खेळाडूंना चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही. आविष्का फर्नांडो 32 रन, मिनोद भानुका 27 रन, भानुका राजपक्षे 24 रन, चरीथ असलंका 38 रन आणि दासून शनाका 39 रन करून आऊट झाले. भारताकडून दीपक चहर, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यातून मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) दोन खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांना वनडे कॅप देण्यात आली. शिखर धवन (Shikhar Dhawan) याचीही कर्णधार म्हणून ही पहिलीच मॅच आहे. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नवोदितांना संधी देण्यात आली आहे. शिखर धवन टीमचा कर्णधार आहे, तर राहुल द्रविडची पहिल्यांदाच टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. टी-20 वर्ल्ड कपआधीचा भारताचा हा अखेरचा मर्यादित ओव्हरचा दौरा आहे, त्यामुळे या सीरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड व्हायची शक्यता आहे.
  Published by:Shreyas
  First published: