• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL : द्रविड 'सर' टीम इंडियाच्या हडलमध्ये, जोश वाढवण्यासाठी खेळाडूंना म्हणाले... VIDEO

IND vs SL : द्रविड 'सर' टीम इंडियाच्या हडलमध्ये, जोश वाढवण्यासाठी खेळाडूंना म्हणाले... VIDEO

देशासाठी खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs Sri Lanka) अशाच दोन खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालं. मुंबईचा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि झारखंडचा इशान किशन (Ishan Kishan) यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

 • Share this:
  कोलंबो, 18 जुलै : देशासाठी खेळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (India vs Sri Lanka) अशाच दोन खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालं. मुंबईचा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि झारखंडचा इशान किशन (Ishan Kishan) यांनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याआधी या दोघांनी वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीयमध्येही एकाच सामन्यातून पदार्पण केलं होतं. श्रीलंकेविरुद्ध राहुल द्रविडने (Rahul Dravid) दोन्ही खेळाडूंना वनडे कॅप देत शुभेच्छा दिल्या आणि खेळाडूंचं धैर्य वाढवलं. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं. या सामन्यात संजू सॅमसनला संधी देण्यात येईल, असं वाटलं होतं. पण टीमने इशान किशनवर विश्वास दाखवला. सूर्यकुमार आणि इशान किशन यांना या सीरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) टीममध्ये स्थान निश्चित करण्याची सुवर्ण संधी आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडने सगळ्या नवोदित खेळाडूंचं स्वागत केलं, तसंच खेळाडूंच्या कठोर मेहनतीचं कौतुकही केलं. 'तुमच्यासाठी ही मोठी उपलब्धता आहे. तसंच तुमच्या कुटुंबाच्या कठोर मेहनतीचाही हा परिणाम आहे,' असं राहुल द्रविड म्हणाला. इशान किशनसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे, कारण आज त्याचा वाढदिवस आहे, असं वक्तव्य राहुल द्रविडने टीम इंडियाच्या हडलमध्ये केलं. बीसीसीआयने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. इशान किशन त्याचा 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी वनडेमध्ये पदार्पण करणारा तो दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. बीसीसीआयने (BCCI) शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड कर्णधार शिखर धवनसोबत उभा आहे आणि टीमचा जोश वाढवण्यासाठी भाषण करताना दिसत आहे. शिखर धवनने इशान किशनला तर सूर्यकुमार यादवला भुवनेश्वर कुमारने वनडे कॅप दिली. या दोघांचं टी-20 आंतरराष्ट्रीयमधलं पदार्पणही एकाच दिवशी झालं होतं.
  Published by:Shreyas
  First published: