मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : द्रविडच्या सल्ल्याने त्याच्या करियरला कलाटणी, आता वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण

IND vs SL : द्रविडच्या सल्ल्याने त्याच्या करियरला कलाटणी, आता वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियातून दोन जणांनी पदार्पण केलं आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे त्यांच्या करियरमधली पहिलीच वनडे खेळणार आहेत.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 18 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियातून दोन जणांनी पदार्पण केलं आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे त्यांच्या करियरमधली पहिलीच वनडे खेळणार आहेत. याआधी वर्षाच्या सुरुवातीला इशान किशनने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये इशान किशनने धमाकेदार सुरूवात केली. ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या इशान किशनने 32 बॉलमध्ये 56 रन केले. 175 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत इशानने 5 फोर आणि 4 सिक्स मारले.

झारखंडचा कर्णधार आणि आयपीएल (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून खेळणाऱ्या इशान किशनने धमाकेदार कामगिरी केली. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hajare Trophy) च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये इशान किशनने 94 बॉलमध्ये 173 रन ठोकले होते. इशान किशनच्या या खेळीमध्ये 11 सिक्स आणि 19 फोरचा समावेश होता. इशान किशनच्या या खेळीमुळे झारखंडने 50 ओव्हरमध्ये 422 रनचा मोठा स्कोअर केला होता. यानंतर मध्य प्रदेशचा 18.4 ओव्हरमध्ये 98 रनवर ऑल आऊट झाला.

विजय हजारे ट्रॉफीच्या त्या मॅचमध्ये इशान किशनने फक्त बॅटनेच कमाल केली नाही, तर विकेटच्या मागेही 7 कॅच पकडले. मागच्या आयपीएलपासूनच इशान किशनच्या कारकिर्दीने नवी उंची गाठली आहे. आयपीएल 2020 मध्ये इशान किशनने मुंबईकडून सर्वाधिक 516 रन केले. आयपीएलमध्ये इशान किशनची सरासरी 57 पेक्षा जास्तची होती, यात त्याने 4 अर्धशतकंही केली.

इशान किशनने त्याच्या या सुधारलेल्या बॅटिंगचं श्रेय राहुल द्रविड (Rahul Dravid) याला दिलं. मोठ्या खेळी करण्यासाठी ऑफ साईडचा खेळ सुधार, असा सल्ला आपल्याला राहुल द्रविडने दिल्याचं इशान किशनने सांगितलं. आपण राहुल द्रविडच्या या सल्ल्यावर मेहनत घेतली आणि आयपीएल तसंच विजय हजारे ट्रॉफीमध्ये कामगिरी सुधारल्याचं इशान किशन म्हणाला.

आता श्रीलंकेमध्येही राहुल द्रविडच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे, त्यामुळे पुढच्या काही दिवसात राहुल द्रविडकडून क्रिकेटच्या अनेक गोष्टी शिकण्याची संधी इशान किशनकडे आहे.

First published:

Tags: India Vs Sri lanka, Ishan kishan, Rahul dravid