कोलंबो, 29 जुलै : भारतीय बॅट्समननं केलेल्या खराब कामगिरीमुळे तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा (Team India) 7 विकेट्सनं पराभव झाला आहे. टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 81 रन केले होते. श्रीलंकेनं हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयाबरोबरच श्रीलंकेनं तीन सामन्यांची टी 20 मालिका 2-1 नं जिंकली आहे. यापूर्वी झालेली वन-डे मालिका टीम इंडियानं 2-1 नं जिंकली होती. त्यानंतर टी20 मालिकेच्या दरम्यान कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोना झाल्यानं भारताचे 9 प्रमुख खेळाडू शेवटच्या दोन सामन्यातून आऊट झाले. त्याचा मोठा फटका टीम इंडियाला या मालिकेत बसला.
82 रनचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वानं सर्वात जास्त 23 रन काढले. भारताकडून राहुल चहर (Rahul Chahar) हा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 15 रन देत 3 विकेट्स घेतल्या. अन्य भारतीय बॉलर्सनी देखील प्रयत्न केले, पण टार्गेट फार मोठे नव्हते. त्यामुळे श्रीलंकेचा विजय ते रोखू शकले नाहीत. श्रीलंकेनं 2019 नंतर पहिल्यांदाच एखादी द्विपक्षीय मालिका जिंकली आहे. तर भारतानं सहा टी20 सीरिज जिंकल्यानंतर एखादी मालिका गमावली आहे. श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेत भारताचा पहिल्यांदाच पराभव झाला आहे.
IND vs SL : चांगल्या खेळाचं बक्षीस, श्रीलंकेच्या खेळाडूच्या 4 IPL टीम संपर्कात
भारतीय बॅट्समनची निराशा
यापूर्वी भारतीय बॅट्समननं निर्णायक सामन्यात मोठी निराशा केली. कॅप्टन शिखर धवननं (Shikhar Dhawan) टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला. धवन पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आऊट झाला. या खराब सुरुवातीनंतर एकाही भारतीय बॅट्समनला चांगली कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाची 9 व्या ओव्हर्समध्येच 5 आऊट 36 अशी अवस्था झाली. या धक्क्यानंतर भारतीय इनिंग सावरलीच नाही. श्रीलंकेकडून हसरंगा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 9 रन देत 4 विकेट्स घेतल्या. 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 81 हा टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्धचा सर्वात कमी स्कोअर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka