Home /News /sport /

INDvsSL : गुवाहटीत पावसाच्या खेळानंतर इंदौरमध्ये काय होणार? हवामान विभागानं दिली 'ही' माहिती

INDvsSL : गुवाहटीत पावसाच्या खेळानंतर इंदौरमध्ये काय होणार? हवामान विभागानं दिली 'ही' माहिती

भारत आणि श्रीलंकेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे चाहत्यांना आता दुसऱ्या सामन्यात काय होणार याची काळजी लागली आहे.

    इंदौर, 07 जानेवारी : भारत आणि श्रीलंकेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे चाहत्यांना आता दुसऱ्या सामन्यात काय होणार याची काळजी लागली आहे. पण क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर असून हवामान विभागाने वातावरण स्वच्छ राहील आणि पावसाची शक्यता नसल्याचं सांगितलं आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 सामना एमपीसीएच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इंदौरमध्ये सध्या रात्री नऊच्या दरम्यान दव पडतात. त्यामुळे टी20 सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याचा परिणाम होऊ शकतो. एमपीसीएचे प्रमुख क्युरेटर समंदर सिंग चौहान यांनी सांगितले की, सामन्यावेळी स्टेडियममध्ये दवामुळे परिणाम होऊ नये यासाठी तीन दिवसांपासून विशेष रसायन फवारले जात आहे. याशिवाय मैदानातील गवतावर पाणी मारलेलं नाही. आम्हाला आशा आहे की, प्रेक्षकांना सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस बघायला मिळेल. भारत-श्रीलंका पहिला टी20 सामना एकही चेंडू न खेळवता रद्द झाला. नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबला पण खेळपट्टी ओलसर झाल्यानं सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना 10 जानेवारीला पुण्यात होणार आहे. वाचा : अखेर संजू सॅमसनला मिळणार संधी? पंत नाही तर 'या' खेळाडूला विराट बसवणार बाहेर भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी 20 सामना मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2020 ला  इंदौर येथे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवरून star sports होणार आहे. याशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर (Hotstar) पाहता येईल. लंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन हेअर ड्रायर आणि इस्त्री वापरणाऱ्यांवर भडकला गांगुली, BCCI करणार कारवाई
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: BCCI, Indore, Team india

    पुढील बातम्या