मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अखेरच्या षटकात पांड्याने घेतली रिस्क, सांगितलं अक्षर पटेलला ओव्हर देण्याचं कारण

अखेरच्या षटकात पांड्याने घेतली रिस्क, सांगितलं अक्षर पटेलला ओव्हर देण्याचं कारण

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात अक्षर पटेलकडे चेंडू सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात अक्षर पटेलकडे चेंडू सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात अक्षर पटेलकडे चेंडू सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 जानेवारी : श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात अक्षर पटेलकडे चेंडू सोपवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कर्णधार हार्दिक पांड्याचा निर्णय सार्थ ठरवला. धावा काढण्याच्या नादात या षटकात अखेरचे दोन फलंदाज धावबाद झाले आणि भारताचा 2 धावांनी विजय झाला.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध क्षेत्ररक्षणावेळी झेल घेताना हार्दिक पांड्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. यामुळे काही काळ तो मैदानाबाहेर होता. याआधीही सामन्यात हार्दिक पांड्याला कमरेला दुखापत झाली होती. तेव्हा तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. श्रीलंकेविरुद्ध 11 व्या षटकात भानुका राजपक्षेचा झेल घेतल्यानंतर हार्दिक पांड्या लंगडत चालताना दिसला.

हेही वाचा : एक मित्र आजारी असल्याने दुसऱ्याला संधी, पदार्पणात शिवम मावीने केली कमाल

अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी अकरा धावा हव्या असताना हार्दिक पांड्याने अक्षर पटेलकडे चेंडू सोपवला. या षटकात धावा रोखण्याचं आणि संघाला विजय मिळवून देण्याचं आव्हान अक्षर पटेल समोर होतं. याच दबावात पहिला चेंडू वाइड पडला. तर त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक षटकारही गेला. पण तरीही पुनरागमन करत अक्षर पटेलने टिच्चून मारा करत विजय मिळवून दिला.

19.1 वाइड बॉल

19.1 रजिथाने एक धाव काढली

19.2 डॉट बॉल

19.3 करुणारत्नेनं षटकार मारला

19.4 डॉट बॉल

19.5 कसुन रझिथा रनआउट

19.6 करुणारत्ने रनआउट

अक्षर पटेलला ओव्हर का दिली?

लोकांना घाबरवायची सवय मला लागली आहे. पण जर मी हसत असेन तर सगळं ठीक आहे समजा. संघाला कठीण परिस्थिती टाकतो कारण यामुळे आम्हाला मोठ्या सामन्यात मदत मिळेल. आम्ही द्विपक्षीय मालिकेत चांगले आहोत आणि आम्ही स्वत:ला आव्हान देत आहे. खरं सांगायचं तर सर्व युवा खेळाडूंनी या स्थितीतून बाहेर काढलं अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली.

सूर्यकुमार स्टँड इन कॅप्टन

हर्षल पटेलने त्याच्या दुसऱ्याच षटकात भानुका राजपक्षेला बाद करत श्रीलंकेला पाचवा धक्का दिला. राजपक्षेचा झेल कर्णधार हार्दिक पांड्याने टिपला. मात्र झेल पकडल्यानंतर तो हॅमस्ट्रिंगच्या तणावामुळे लंडगताना दिसला. मैदानावर उपचारासाठी मेडिकल टीम आली पण हार्दिकने तात्काळ डगआऊटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. काही काळ तो डगआऊटमध्येच बसला होता. त्यावेळी मैदानावर काही चेंडू सूर्यकुमार यादव हा काळजीवाहू कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत होता.

हेही वाचा : IND vs SL T20 : टीम इंडियाकडून हॅप्पी न्यू इयर, श्रीलंकेविरुद्ध रोमहर्षक विजय

हार्दिक पांड्या काही चेंडूनंतर पुन्हा मैदानात परतला. तेव्हा त्याने लगेच शिवम मावीच्या हातात चेंडू दिला. त्याआधीच्या षटकात श्रीलंकेच्या फलंदाजांनी फटकेबाजी केली होती. मात्र शिवमने वानिंदु हसरंगाला बाद करत श्रीलंकेला सहावा धक्का दिला.

First published:

Tags: Cricket, Sports