पहिल्याच टी-20 सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 5 गडी राखून विजय

भारताने दिलेलं 175 धावांचं आव्हान लंकनं टीमने 18.3 षटकार पूर्ण करत विजयी सलामी दिली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2018 11:01 PM IST

पहिल्याच टी-20 सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 5 गडी राखून विजय

06 मार्च : कुशाल परेराच्या 66 धावांच्या खेळीवर श्रीलंकेनं कोलंबो टी-20 सामन्यात भारताचा 5 गडी राखून पराभव केलाय. भारताने दिलेलं 175 धावांचं आव्हान लंकनं टीमने 18.3 षटकार पूर्ण करत विजयी सलामी दिली.

कोलंबोमध्ये निदास ट्राय टी20 सीरीज़चा पहिला सामना पार पडला. भारताने प्रथम फलंदाजी करत 175 धावांचं टार्गेट दिलं होतं. भारताकडून शिखर धवनने तडाखेबाज 90 धावा कुटल्यात. यात 6 षटकार, 6 चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मनीष पांडे 37, रिशभ पंतने 23 धावा केल्यात. टीम इंडियाने 20 षटकार 174 धावा केल्यात.

याला प्रत्युत्तर देत लंकेच्या टीमने सावध सुरुवात केली. पण कुशल परेराने दमदार खेळी करत विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. परेराने 37 चेंडुत  4 षटकार आणि 6 चौकार लगावत 66 धावा करून बाद झाला. लंकेच्या टीमने 18.3 षटकार 175 धावा करून टी-20 सामन्यात विजय मिळवला. भारताकडून वाॅशिंगटन सुंदर आणि चहने प्रत्येक 2-2 गडी बाद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2018 11:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...