Home /News /sport /

IND vs SL : भारताने 9 नव्या खेळाडूंना दिली संधी, दोघं अजूनही बेंचवर

IND vs SL : भारताने 9 नव्या खेळाडूंना दिली संधी, दोघं अजूनही बेंचवर

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेत आतापर्यंत 9 खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे, पण अजूनही दोन जण पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत.

    कोलंबो, 26 जुलै : टीम इंडियाचे युवा खेळाडू सध्या श्रीलंका दौऱ्यावर (India vs Sri Lanka) आहेत. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारताने वनडे सीरिजमध्ये 2-1ने विजय मिळवला. यानंतर टी-20 सीरिजमध्येही भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. सीरिजची दुसरी मॅच 27 जुलैला मंगळवारी होणार आहे. उरलेल्या दोनपैकी एक सामना जिंकून ही सीरिजही जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियाने श्रीलंकेत आतापर्यंत 9 खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे, पण अजूनही दोन जण पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या वनडेमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांना संधी मिळाली होती. या दोघांची ही पहिलीच वनडे मॅच होती. इंग्लंडविरुद्ध वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. IND vs ENG : पृथ्वी शॉ ओपनिंगचा पर्याय, सूर्याला या क्रमांकावर संधी! वनडे सीरिजच्या अखेरच्या सामन्यात भारताने चेतन सकारिया (Chetan Sakaria), कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham), नितीश राणा (Nitish Rana), राहुल चहर (Rahul Chahar) आणि संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी दिली. या पाचही जणांना पहिल्यांदाच वनडे खेळण्याची संधी मिळाली. यानंतर पहिल्या टी-20 मध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याआधी शॉ भारताकडून टेस्ट आणि वनडे क्रिकेट खेळला होता. श्रीलंका दौऱ्यात 20 सदस्यांच्या टीमला पाठवण्यात आलं आहे, यातल्या 18 खेळाडूंना 4 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, पण देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) अजूनही बेंचवरच बसले आहेत. अखेरच्या दोन टी-20 मध्ये शिखर धवन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांना संधी देऊ शकतात. हे दोन्ही युवा खेळाडू ओपनर म्हणून खेळतात. सीरिजच्या चारही सामन्यांमध्ये शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी ओपनिंग केली आहे. अखेर ठरलं! 2 मुंबईकर होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा देवदत्त पडिक्कलने टी-20 क्रिकेटमध्ये 39 मॅच खेळून 43 च्या सरासरीने 1,466 रन केले, यामध्ये दोन शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये या वर्षी त्याने 800 पेक्षा जास्त रन केले. आयपीएलमध्ये पडिक्कल विराटच्या आरसीबीकडून (RCB) खेळतो. तर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडनेही टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. 46 मॅचमध्ये 33 च्या सरासरीने त्याने 1,337 रन केले आणि 11 अर्धशतकं केली. आयपीएलमध्ये ऋतुराज एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळतो.
    First published:

    Tags: India Vs Sri lanka

    पुढील बातम्या