साहाचे अफलातून झेल, आकडेवारी सांगते तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक

भारताचा यष्टीरक्षक ऋद्धिमान साहाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील दुसऱ्या डावात हवेत झेप घेत अफलातून झेल पकडला.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 04:21 PM IST

साहाचे अफलातून झेल, आकडेवारी सांगते तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक

पुणे, 13 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या डावात भारताने 601 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर दुसऱ्या डावातही सलामीवीर लवकर बाद झाले. यात भारताचा यष्टीरक्षक ऋद्धिमान साहानं घेतलेल्या झेलची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावातही थ्युनिश डी ब्रायनचा जबरदस्त झेल घेतला होता. दुसऱ्या डावातही त्यानं एक अफलातून झेल टिपला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना सहाव्या षटकात उमेश यादव गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर थ्युनिश डी ब्रायन लेग साइडला चेंडू फ्लिक करण्याच्या तयारीत होता. मात्र, चेंडू बॅटची कड घेऊन मागे गेला. तेव्हा साहाने सूर मारून चेंडू एका हाताने झेलला. त्याच्या या चपळाईचं कौतुक सोशल मीडियावर रंगलं आहे.

याआधी विंडीज दौऱ्यावर साहाच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. त्यात पंतला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तसेच खराब फटकेबाजीमुळे त्याच्यावर सातत्यानं टीका होत आहे.

पहिल्या झेलनंतर पुन्हा अश्विनच्या गोलंदाजीवर ड्युप्लेसीचा सोपा झेल घेताना मात्र साहाला कसरत करावी लागली. यात हातात आलेला चेंडू सुटल्यानंतर त्याला दोन तीन वेळा तो झेलण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अखेर त्यातही त्यानं संयम राखत झेल टिपला. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading...

आता साहाच्या यष्टीरक्षणाचे कौतुक करताना पंत साहाकडून काहीतरी शिक असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात आतापर्यंत दोन झेल साहाने यष्ट्यांमागे टिपले आहेत. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली होती. त्यात त्याने 21 धावा काढल्या होत्या. याशिवाय यष्टीमागे एक झेलही घेतला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खेळत असेलेल्या यष्टीरक्षकांमध्ये साहा सर्वोत्कृष्ठ ठरला आहे. वेगवान गोलंदाजीवेळी झेल घेण्यात त्यानं आघाडी घेतली आहे. यात त्याची अचुकता 96.9 टक्के इतकी आहे. त्याच्या खालोखाल लंकेच्या निराशेन डिक्वेला 95.5 टक्के आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो 95.2 टक्क्यांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत 91.6 टक्क्यांसह नवव्या स्थानावर आहे.

वाचा : विराटचा ऐतिहासिक दणका, आफ्रिकेवर पहिल्यांदाच ओढवली 'ही' नामुष्की

पाहा : आऊट झाला की नाही? अश्विनच्या मिस्ट्री बॉलनं सगळेच चक्रावले, VIDEO VIRAL

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: team india
First Published: Oct 13, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...