टीम इंडियाला पराभूत करू शकतो जगातील 11 खेळाडूंचा संघ!

टीम इंडियाला पराभूत करू शकतो जगातील 11 खेळाडूंचा संघ!

मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकून विश्वविक्रम केलेल्या संघाला पराभूत करण्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूंनी जगातील उत्कृष्ट खेळाडूंचा संघ तयार केला आहे.

  • Share this:

रांची, 21 ऑक्टोबर : भारतीय संघाला घरच्या मैदानावर पराभूत करणं कठीण आहे. धोनी, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात गेल्या 11 कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. हा एक विश्वविक्रम आहे. भारताच्या आधी ऑस्ट्रेलियानं सलग 101 कसोटी मालिका जिंकण्याच विक्रम केला होता.

भारतीय संघ सध्या मायदेशात जगातील कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सध्याच्या संघातील प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये असून भारत लागोपाठ सामने जिंकत आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने पहिले चार कसोटी सामने जिंकले आहेत. तर सध्या आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यातही भारत विजय मिळवण्याची शक्यता आहे.

कसोटी खेळणाऱ्या देशांपैकी कोणताही एक संघ भारताला मायदेशात पराभूत करू शकत नाही असं मत दिग्गजांनी व्यक्त केलं आहे. भारताला पराभूत करण्याची ताकद असलेला जगातील 11 खेळाडूंचा एक संघ दिग्गज खेळाडू आणि तज्ज्ञांनी तयार केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या देशातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतामधील कामगिरीच्या जोरावर खेळाडू निवडले असून यादी तयार करण्यात आली आहे.

वाचा : हिटमॅनची पुन्हा थोडीशी गंमत! द्विशतकानंतर रोहित काय म्हणाला पाहा VIDEO

रांचीमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यावेळी तिसऱ्या दिवशी उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला तेव्हा क्रिकेट समालोचक आणि माजी खेळाडूंनी वर्ल्ड इलेव्हन संघाबद्दल मत व्यक्त केलं. व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण, आकाश चोपडा यांनी याबद्दल प्रेक्षकांना सांगितलं.

वाचा : रोहित 199 वर अडकला, जोफ्रा आर्चरचं 6 वर्षे जुनं ट्विट झालं व्हायरल

वर्ल्ड इलेव्हनचं नेतृत्व न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विल्यम्सनकडं दिलं आहे. यामध्ये सलामीवीर म्हणून टॉम लॅथम, डीन एल्गर किंवा डेव्हिड वॉर्नर यांचे नाव आहे. याशिवाय मधल्या फळीत स्टीव्ह स्मिथ, बाबर आझम असून यष्टीरक्षक म्हणून मुश्फिकुर रहीमचं नाव घेतलं आहे. तसेच शाकिब अल हसन आणि बेन स्टोक्स या अष्टपैलू खेळाडूंचाही यामध्ये समावेश आहे. गोलंदाजीची धुरा फिरकीपटू नाथन लायनच्या खांद्यावर असून पेंट कमिन्स आणि ट्रेन्ट बोल्ट यांचे नाव आहे. 12 वा खेळाडू म्हणून राशिद खानचे नाव घेतले आहे.

VIDEO : उमेश यादवचा विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

First published: October 21, 2019, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading