मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : नेमकी काय आहे Hamstring Injury? ज्यामुळे रोहित शर्मा झाला टीमबाहेर

IND vs SA : नेमकी काय आहे Hamstring Injury? ज्यामुळे रोहित शर्मा झाला टीमबाहेर

रोहित शर्मा वनडे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर पहिलीच वन-डे सीरिज खेळू शकेल की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. कारण त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरी (Hamstring Injury to Rohit Sharma) झाली आहे.

रोहित शर्मा वनडे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर पहिलीच वन-डे सीरिज खेळू शकेल की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. कारण त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरी (Hamstring Injury to Rohit Sharma) झाली आहे.

रोहित शर्मा वनडे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर पहिलीच वन-डे सीरिज खेळू शकेल की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. कारण त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरी (Hamstring Injury to Rohit Sharma) झाली आहे.

  मुंबई, 15 डिसेंबर : रोहित शर्मा वनडे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर पहिलीच वन-डे सीरिज खेळू शकेल की नाही, याबद्दल शंका निर्माण झाली आहे. कारण त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरी (Hamstring Injury to Rohit Sharma) झाली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये तर तो खेळणार नाही हे निश्चित झालंच आहे; मात्र 19 जानेवारीपासून सुरू होणार असलेल्या वन-डे सीरिजमध्येही तो खेळेल की नाही याची शंका आहे. हॅमस्ट्रिंग इंज्युरी म्हणजे नेमकं काय असतं, याची माहिती घेऊ या.

  हॅमस्ट्रिंग (Hamstring Muscle) हे स्नायूचं नाव असून, हिप्सपासून गुडघ्यांपर्यंतच्या भागात जांघांच्या पाठीमागे असलेला हा स्नायू आहे. खेळाडू सातत्याने धावत असल्याने त्या स्नायूवर ताण येतो आणि दुखापत होते. त्यालाच हॅमस्ट्रिंग इंज्युरी असं म्हणतात. क्रिकेट, फुटबॉल, रग्बी, टेनिस अशा प्रकारच्या अनेक खेळांमधल्या खेळाडूंना हॅमस्ट्रिंग इंज्युरी होऊ शकते.

  या सगळ्या खेळांमध्ये भरपूर धावावं लागतं. तसंच धावताना (Running) अचानक दिशाही बदलावी लागते. त्यामुळे या खेळाडूंच्या कमरेच्या खालच्या भागावर, तसंच पायावर खूप ताण येतो. त्यामुळे काही वेळा जांघेच्या आजूबाजूच्या भागात स्नायू ताणले गेल्यामुळे खेळाडूंना वेदना सहन कराव्या लागतात, सूजही येते. त्यामुळे त्यांना नीट धावता येत नाही.

  प्रत्यक्ष खेळतानाच नव्हे, तर प्रॅक्टिस करताना किंवा व्यायाम करतानाही ही दुखापत होऊ शकते. एखाद्या खेळाडूला एकदा ही दुखापत झाली, तर त्याला वारंवार तो त्रास होण्याची शक्यता बळावते. बराच काळ विश्रांती घेऊन नंतर मैदानावर उतरणाऱ्या खेळाडूंनाही ही दुखापत होऊ शकते.

  शरीराला आराम देणं हा या दुखापतीतून बरं होण्याचा महत्त्वाचा उपाय आहे. RICE (Rest, Ice, Compression & Elevation) थेरपीच्या साह्याने यावर उपचार केले जातात. त्यात शरीराला आराम देणं, बर्फाने शेकणं आणि फिजिओथेरपीच्या साह्याने शरीराच्या त्या भागाच्या हालचाली घडवून आणणं आदींचा समावेश असतो. हॅमस्ट्रिंग इंज्युरी खूपच गंभीर असेल, तरच सर्जरी करण्याचा पर्याय डॉक्टर्स सुचवतात.

  दुखापत किती गंभीर आहे, हे पाहून संबंधित खेळाडूला पुरेसा वेळ दिला जातो. रोहित शर्मा आता तीन आठवड्यांसाठी टीमच्या बाहेर असेल. या कालावधीत त्याच्यावर उपचार केले जातील आणि तो बरा होईल.

  भारतीय टीममध्ये झहीर खानला या दुखापतीचा सर्वांत जास्त सामना करावा लागला. इंग्लंडविरुद्ध 2011 मध्ये झालेल्या पहिल्याच टेस्टमध्ये झालेल्या या दुखापतीमुळे झहीर खान सीरिज खेळू शकला नाही. त्यामुळे भारतीय टीमला बरीच मोठी किंमत चुकवावी लागली. खासकरून फास्ट बॉलर्सना ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. आशिष नेहरालाही करिअरमध्ये बऱ्याच वेळा या दुखापतीचा सामना करावा लागला.

  First published:

  Tags: Rohit sharma