‘तू तुझ्याच स्टाईलनं खेळ नाहीतर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं रोहितला दिली वॉर्निंग

‘तू तुझ्याच स्टाईलनं खेळ नाहीतर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं रोहितला दिली वॉर्निंग

दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या सराव सामन्यात सलामीला आलेला रोहित शुन्यावर बाद झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : बोर्ड प्रजिडेंट इलेव्हन आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तीन एकदिवसीय सराव सामन्यात रोहित शर्मानं निराशाजनक कामगिरी केली. कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. दुसऱ्याच चेंडूवर आपलं खात न उघडता रोहित बाद झाला. त्यामुळं आता रोहितचे सलामीसाठीचे दरवाजे जवळजवळ बंद झाले आहे. त्यामुळं 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत सलामीला कोणता फलंदाज फलंदाजी करणार हे पाहावे लागणार आहे.

बोर्ड प्रसिडेंट इलेव्हन आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन दिवसीय सामना खेळला जात आहे. याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकीनं 279-6 धावांवर घोषित करण्यात आला. पहिला दिवस पावसामुळं रद्द झाला. तर दुसऱ्या दिवशी आफ्रिकीनं टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . पहिल्या दिवशी आफ्रिकीनं 199-4 धावा केल्या. यावेळी फॉर्ममध्ये असलेल्या आफ्रिकेच्या अडेन मार्करमनं शानदार शतकी खेळी केली. मात्र भारताच्या डावात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. यामुळं भारताच्या सलामीचे प्रश्न उभा राहिला आहे.

वाचा-रोहितसाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे बंद! दुहेरी शतकांच्या बादशाहला झालयं तरी काय?

यावेळी भारताचा माजी फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मण यानं रोहित शर्माला सल्ला दिला आहे. लक्ष्मणनं, “रोहितनं मी केलेली चुक करू नये”, असा सल्ला दिला आहे. लक्ष्मणनं रोहितनं त्याच्याच अंदाजात खेळायले हवे, त्यानं आपल्या खेळीत बदल केले की त्याचे परिणाम उलटे होतात, असे सांगितले. एका कार्यक्रमात बोलताना लक्ष्मणनं रोहितला सल्ला दिला.

‘रोहितनं मी केलेली चुक करू नये’

लक्ष्मणला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ओळखले जात असे. मात्र 1996-98मध्ये लक्ष्मणला अचानक सलामीला फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. लक्ष्मणला कधीच सलामीला फलंदाज करण्याचे मन नव्हते. यावेळी लक्ष्मणनं रोहितबाबत बोलताना, “सगळ्यात जास्त फायद्याची गोष्ट म्हणजे रोहितकडे अनुभव आहे, जो माझ्याकडे नव्हता. मी फक्त चार कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी केली. रोहितनं 12 वर्षात आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी केली. त्यामुळं तो परिपक्व आहे. मी सलामीला फलंदाजी करून चूक केली. मी माझी स्टाईल बदलली त्याचा नुकसान मला झाला. रोहितनं असे नाही केले पाहिजे”, असे सांगितले.

वाचा-…तर टीम इंडियाला नवीन खेळाडू कधीच मिळणार नाहीत, द्रविडनं व्यक्त केली भीती

केएल राहुलच्या जागी रोहितला मिळाली संधी

वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितला अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्याजागी केएल राहुल सलामीला फलंदाजीला उतरला होता. मात्र राहुलला एकाही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं दक्षिण आफ्रिका विरोधात केएल राहुलला संघात जागा देण्यात आली नाही. त्यामुळं रोहित शर्माला सलामीला फलंदाजीसाठी संधी मिळू शकते. मात्र सराव सामन्यात शुन्यावर बाद झाल्यानंतर आता विराट सलामीला कोणाला उतरवणार हे पाहावे लागणार आहे. वेस्ट इंडिज विरोधात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी सलामीला फलंदाजी केली होती.

टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह कसोटीत मात्र फेल

वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळं रोहितचे एकदिवसीय आणि टी-20 मधले रेकॉर्ड पाहता, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे रोहितनं 218 एकदिवसीय सामन्यात 8 हजार 686 धावा केल्या आहेत. तर, दुसरीकडे रोहितनं केवळ 27 कसोटी सामने खेळले आहेत. यात 1 हजार 585 धावा केल्या आहेत. 177ही कसोटी क्रिकेटमधली रोहितची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

वाचा-सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणाऱ्या खेळाडूनं घेतली निवृत्ती! 'हे' आहे कारण

साक्षात लतादीदींनी नेहा राजपालला दिला आशीर्वाद, कारण...

Published by: Priyanka Gawde
First published: September 28, 2019, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading