मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : चुकीला माफी नाही! धोनीचा 'गुरूमंत्र' देऊन कोहलीचा पंतला इशारा

IND vs SA : चुकीला माफी नाही! धोनीचा 'गुरूमंत्र' देऊन कोहलीचा पंतला इशारा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला (India vs South Africa 3rd Test) मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. या मॅचआधी विराट कोहली (Virat Kohli) ऋषभ पंतने (Rishabh Pant) जोहान्सबर्ग टेस्टमध्ये मारलेल्या खराब शॉटबाबत बोलला. हे सांगताना त्याने एमएस धोनीचा (MS Dhoni) गुरूमंत्रही सांगितला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

केपटाऊन, 10 जानेवारी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला (India vs South Africa 3rd Test) मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. सेंच्युरियनमधल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन केलं, यानंतर सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. आता सीरिजची तिसरी टेस्ट जिंकवून इतिहास घडवण्याची संधी भारतीय टीमला आहे. आतापर्यंत कधीच टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. केपटाऊनचं रेकॉर्ड मात्र भारताच्या बाजूने नाही. या मैदानात भारताला एकही टेस्ट जिंकता आलेली नाही. असं असलं तरी भारतासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) या मॅचसाठी फिट झाला आहे.

तिसऱ्या टेस्टसाठी आपण पूर्णपणे फिट झालो असून ही टेस्ट खेळणार असल्याचं खुद्द विराट कोहलीनेच स्पष्ट केलं आहे. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टआधी विराटच्या पाठीला दुखापत झाली, त्यामुळे तो ही टेस्ट खेळू शकला नव्हता. त्याच्याऐवजी केएल राहुलला (KL Rahul) टीमचं नेतृत्व देण्यात आलं होतं. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला, ज्यानंतर केएल राहुलच्या कॅप्टन्सीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राहुलच्या कॅप्टन्सीवरही विराटने प्रतिक्रिया दिली. राहुलची कॅप्टन्सी आणि त्याची रणनिती संतुलित आहे, असं विराट म्हणाला. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्येही राहुलच टीमचा कर्णधार असेल.

ऋषभ पंतची चूक

जोहान्सबर्ग टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) तिसऱ्याच बॉलला मोठा शॉट मारण्याच्या नादात आऊट झाला. यानंतर पंतवर मोठ्या प्रमाणावार टीका करण्यात आली. पंतचा तो शॉट पाहून कॉमेंट्री करणारे सुनिल गावसकरही (Sunil Gavaskar) चांगलेच संतापले होते. ऋषभ पंतसोबत नेट प्रॅक्टिसवेळी चर्चा झाली असल्याचं विराटने सांगितलं. प्रत्येक खेळाडूला आपण काय चूक करतोय हे माहिती असतं. तो लवकरच पुनरागमन करेल आणि मोठ्या सामन्यात टीमसाठी महत्त्वाची खेळी करेल, असा विश्वास विराटने व्यक्त केला.

'जर तुम्ही चूक केली असेल, तर तीच चूक दुसऱ्यांदा होण्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 महिन्यांचं अंतर असलं पाहिजे. तेव्हाच तुमचं करियर जास्त काळ चालू शकतं, असं एमएस धोनीने (MS Dhoni) मला सांगितलं. मी ही गोष्ट समजलो आणि त्यानुसार स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न केला. आम्हीही करियरमध्ये चुका करतो, मग त्या दबावात असो किंवा चुकीचा शॉट खेळण्याच्या नादात,' असं वक्तव्य विराट कोहलीने केलं.

First published:

Tags: MS Dhoni, Rishabh pant, South africa, Team india, Virat kohli