VIDEO : रोहितकडून अशी अपेक्षा नव्हती, विजयानंतर विराटनं केलं मोठं वक्तव्य

VIDEO : रोहितकडून अशी अपेक्षा नव्हती, विजयानंतर विराटनं केलं मोठं वक्तव्य

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीला खेळताना रोहित शर्माने चार डावात 529 धावा केल्या. त्याने मालिकावीर पुरस्कारही पटकावला.

  • Share this:

रांची, 23 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताना निर्विवाद वर्चस्व गाजवत 3-0 ने मालिका जिंकली. या मालिकेत शेवटच्या सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्माचे कौतक करताना विराट कोहली म्हणाला की, रोहित इतका चांगला खेळ करेल अशी अपेक्षा नव्हती. रोहित शर्मा पहिल्यांदाच कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून उतरला. यात त्याने तीन कसोटीमध्ये मिळून तीन शतकांसह 529 धावा केल्या.

विराट म्हणाला की, आफ्रिकेविरुद्ध विजयाचं श्रेय रोहितला जातं. त्याने कोणतंही टेन्शन आणि दबाव न घेता खेळला. याशिवाय सलामीवीर म्हणून खेळताना त्याच्या कामगिरीबद्दल शंका होती. मात्र त्याने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.

रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर आहे पण कसोटीत सलामीला तो कसा खेळेल याबद्दल थोडी धाकधूक होती. पावसामुळे दोन सत्रांचा खेळ वाया गेला पण रोहित शर्माने वेगाने धावा केल्या. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेला दोनवेळा ऑलआऊट करण्याची संधी मिळाली आणि मालिका 3-0 ने जिंकू शकलो असंही विराट म्हणाला.

कसोटीत सलामीला खेळताना रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक केलं. यात 176 आणि 127 धावांची खेळी केली. त्यानंतर पुण्यातील कसोटीत त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं. त्याच्या 212 धावांच्या जोरावर भारताने 9 बाद 497 धावा केल्या.

विराटने रोहितचं कौतुक करताना म्हटलं की, सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना रोहितनं पहिल्याच मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावला. तसेच भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी जबरदस्तक कामगिरी केली. मयंक अग्रवालने संघात नवा असूनही चांगला खेळ केला. तर अजिंक्य रहाणेनं पुनरागमन करताना मायदेशात शतकी कामगिरी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 08:25 AM IST

ताज्या बातम्या