सेंच्युरियन, 29 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या (India vs South Africa 1st Test) तिसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीसोबतच (Virat Kohli) टीम इंडियाची चिंता वाढली होती. दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग सुरू असताना 11 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) पाऊल पूर्णपणे वाकडं झालं, यानंतर बुमराह विव्हळत मैदानातच बसला. बुमराहला दुखापत झाल्यानंतर टीमचे फिजियो नितीन पटेल लगेच मैदानात आले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये घेऊन गेले. बुमराहऐवजी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फिल्डिंगला आला.
बुमराह मैदानाबाहेर गेला तेव्हा भारतीय खेळाडू आणि चाहत्यांच्या मनातही तो या सामन्यात पुन्हा खेळेल का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला. पण बुमराह 48व्या ओव्हरनंतर मैदानात परतला. बुमराह मैदानात उतरताच कोहलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा झाला होता. बुमराह मैदानात आल्यानंतर विराटने त्याचं स्वागत केलं.
'अखेर रॉक आलाच', असं विराट म्हणाला. विराटचं हे वाक्य स्टम्प माईकमध्ये कैद झालं. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटचा इशारा WWE चा सुपरस्टार द रॉककडे होता.
What is this behavior @imVkohli You have to be rude to your players and not cheer for them, because you aren't good with your team mates.! pic.twitter.com/vJB8mnqNXq
— Gudiya! (@kohlixcutiee) December 28, 2021
रॉकने (The Rock) 8 वर्षांनंतर WWE रिंगमध्ये पुनरागमन केलं तेव्हा त्याचा पहिला डायलॉग होता 'फायनली द रॉक इज बॅक'. रॉकचा हा डायलॉग बराच लोकप्रिय झाला होता.
Bumrah comes back to bowl after a lengthy break. Kohli: FINALLY, THE ROCK HAS COME BACK!! Referring to this epic comeback line by Rock, who came back to WWE in 2011 after a 8-year hiatus. Absolute goosebumps to hear Kohli say that! What a reference! Virat um WWE fan polarku! pic.twitter.com/EHe9waR4Qa
— Srini Mama (@SriniMaama16) December 28, 2021
Just before going for the ad at the end of 60th over, Kohli was uttering 'Finally the rock has come back'#SAvIND pic.twitter.com/rpoXwx77xE
— Bourgeois (@NaMoStadium) December 28, 2021
बुमराहने मैदानात पुनरागमन केलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 144/7 एवढा होता. आयसीसीच्या नियमांनुसार मैदानाबाहेर गेलेल्या खेळाडूला लगेच बॉलिंग करायला मिळत नाही, त्यामुळे बुमराहला बॉलिंग मिळायला उशीर झाला. यानंतर जेव्हा बुमराहला बॉलिंग देण्यात आली तेव्हा त्याने केशव महाराजची विकेट घेतली.
बुमराहने पहिल्या इनिंगमध्ये 7.2 ओव्हर बॉलिंग केली. त्याने आपल्या ओव्हरच्या पाचव्याच बॉलला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारला आऊट केलं, यानंतर बुमराहला बाहेर जावं लागलं. दुखापत झाली नसती तर त्याने दक्षिण आफ्रिकेला 200 रनच्या जवळही पोहोचू दिलं नसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jasprit bumrah, Virat kohli