मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'सकाळीच सकाळी ही कामं करू नकोस', विराटच्या विमानातल्या कृत्यामुळे इशांत नाराज, VIDEO

'सकाळीच सकाळी ही कामं करू नकोस', विराटच्या विमानातल्या कृत्यामुळे इशांत नाराज, VIDEO

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम तीन टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) पोहोचली आहे. भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इशांत शर्माची (Ishant Sharma) खिल्ली उडवली. विराटच्या या वागणुकीमुळे इशांत शर्माही नाराज झाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

जोहान्सबर्ग, 17 डिसेंबर : विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम तीन टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) पोहोचली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून खेळाडूंचे विमानातले फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. या व्हिडिओमध्ये भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इशांत शर्माची (Ishant Sharma) खिल्ली उडवताना दिसत आहे. विराटच्या या वागणुकीमुळे इशांत शर्माही नाराज झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सकाळीच सकाळी अशा गोष्टी करू नकोस, असं इशांतने विराटला ऐकवलं.

विमानामध्ये विराट कोहलीने इशांत शर्माच्या सामानाची तपासणी केली आणि त्याची खिल्ली उडवली. इशांत शर्मा पॅक केलेल्या या गोष्टींसह जगात कुठेही प्रवास करू शकतो, असं विराट म्हणाला. विराटच्या या वक्तव्यामुळे इशांत शर्मा वैतागला आणि सकाळीच सकाळी अशी कामं नको करूस, असं म्हणाला.

आफ्रिका दौऱ्याआधी वाद

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे नवा वाद निर्माण झाला. विराटची वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर सौरव गांगुलीला याबाबत विचारण्यात आलं होतं. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं होतं पण त्याने नकार दिला. यानंतर निवड समितीला मर्यादित ओव्हरसाठी एकच कर्णधार असला पाहिजे असं वाटलं, ज्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं गांगुलीने सांगितलं. गांगुलीने केलेला हाच दावा विराट कोहलीने पत्रकार परिषदेत फेटाळून लावला.

First published: