पंतने विराटला तोंड लपवायला जागा ठेवली नाही, शेवटी टोपीचा आधार!

पंतने विराटला तोंड लपवायला जागा ठेवली नाही, शेवटी टोपीचा आधार!

धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षकाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पंतला मोठी खेळी करण्यात अपयश आले.

  • Share this:

बेंगळुरू, 23 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीला त्याच्या एका निर्णय़ामुळं तोंड लपवायला जागा राहीली नाही. विराटनं वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या गोलंदाीवर रेजा हेड्रिक्सविरुद्ध डीआरएस घेतलं. यासाठी त्यानं ऋषभ पंतचा सल्ला घेतला होती. पंतने कोहलीला डीआरएस घेण्यास सांगितलं होतं. मात्र, हा निर्णय इतका चुकीचा होता की कोहलीचं हसू झालं. त्यानंतर कोहलीने त्याचं तोंड टोपीत लपवलं.

विराट कोहलीनं यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि दीपक चाहरच्या सांगण्यावरून डीआरएस घेतला. पण हा निर्णय भारताविरुद्ध आला. त्यानंतर दोघांनाही हसू रोखता आलं नाही.

दक्षिण आफ्रिका फंलदाजी करत असताना सहाव्या षटकात हा प्रकार घडला. चाहरच्या तिसऱा चेंडू हेंड्रिक्सच्या पॅडवर आदळला. यावेळी चाहर आणि पंतने पायचितचं अपील केलं पण पंचांनी ते फेटाळून लावलं. मात्र, चाहर आणि पंतच्या सांगण्यावरून विराटनं डीआरएस घेतला. त्यात फलंदाज बाद नसल्याचं दिसत होतं. मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला गेला. यामुळे भारताचा डीआरएस वाया गेला.

डीआरएसचा निर्णय पाहताच विराट कोहलीनं त्याचा चेहरा टोपीत लपवला. यावेळी समालोचकसुद्धा हसत होते. पंतही डीआरएसचा निर्णय पाहून नाराज झाला तर चाहर हसत होता. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हात डीआरएसमध्ये कोणीही धरू शकत नाही. अजुन कोहलीलासुद्धा डीआरएसमध्ये अचूक निर्णय घेणं कठीण जात आहे.

Loading...

भारतीय खेळाडूंनी टी20 मध्ये सुस्त फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 135 धावांचे आव्हान दिले. हे माफक आव्हान आफ्रिकेने एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कर्णधार क्विंटन डी कॉकच्या नाबाद 79 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं सोपा विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2019 12:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...