मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : विराटच्या चुकीमुळे झाला टीम इंडियाचा पराभव, आफ्रिकेच्या कॅप्टनने सांगितला टर्निंग पॉईंट!

IND vs SA : विराटच्या चुकीमुळे झाला टीम इंडियाचा पराभव, आफ्रिकेच्या कॅप्टनने सांगितला टर्निंग पॉईंट!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa) 7 विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने 3 टेस्ट मॅचची सीरिज 2-1 ने गमावली. तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय कसा झाला, यावर कर्णधार डीन एल्गारने (Dean Elgar) प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

केपटाऊन, 15 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa) 7 विकेटने पराभव झाला. याचसोबत भारताने 3 टेस्ट मॅचची सीरिज 2-1 ने गमावली. तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय कसा झाला, यावर कर्णधार डीन एल्गारने (Dean Elgar) प्रतिक्रिया दिली आहे. डीआरएस वादामुळे आम्हाला भारताविरुद्धच्या निर्णायक टेस्टमध्ये आव्हानापर्यंत पोहोचण्याचा वेळ मिळाला. डीआरएस वादामुळे भारतीय टीमचं लक्ष विचलित झालं, असं एल्गार म्हणाला आहे. अश्विनच्या बॉलिंगवर एलबीडब्ल्यू झाल्यानंतर एल्गारने डीआरएस घेतला. यानंतर हॉक-आयने बॉल स्टम्पवरून जात असल्याचं दाखवलं आणि एल्गारला जीवनदान मिळालं.

एल्गारला नॉट आऊट देण्यात आल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सुपरस्पोर्ट या मॅचचं प्रसारण करणाऱ्या चॅनलवरच आरोप करायला सुरूवात केली. स्टम्प माईकसमोर जाऊन भारतीय टीमच्या खेळाडूंनी वादग्रस्त वक्तव्यं केली.

भारताने दिलेल्या 212 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर वाद झाला तेव्हा 60/1 एवढा झाला होता. डीआरएस वादानंतर भारतीय टीमचं मॅचवरचं संतुलन गेलं आणि पुढच्या 8 ओव्हरमध्ये आफ्रिकेने 40 रन केले. 'यामुळे आमचा फायदा झाला. आम्हाला वेळ मिळाला आणि रन जलद आले, ज्यामुळे आव्हानाचा पाठलाग करायला मदत मिळाली. डीआरएस वादानंतर ते मॅचबद्दल विसरून गेले आणि भावुक झाले. मला यात खूप मजा आली. बहुतेक ते दबावात होते आणि परिस्थिती अनुकूल नव्हती. या गोष्टींची त्यांना सवय नाही,' असं वक्तव्य डीन एल्गारने केलं.

DRS चा वाद, विराटची स्टम्प माईकवर टीका, आता SuperSport ने दिलं प्रत्युत्तर

'आम्ही खूप खूश होतो, पण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आम्हाला बॅटिंग करायची होती. खेळपट्टीही बॉलिंगला मदत करत होती. आम्हाला जास्त शिस्त दाखवून खेळणं गरजेचं होतं. घरामध्ये पहिली मॅच हरणं कधीच चांगलं नाही, पण यानंतर आम्ही क्षमतेने खेळलो आणि बाकीच्या मॅच जिंकलो,' अशी प्रतिक्रिया एल्गारने दिली.

स्टम्प माईकमधल्या वक्तव्यांमुळे वाद

'आपल्या टीमकडेही लक्ष द्या, जेव्हा ते बॉल चमकवत होते. फक्त विरोधी टीमकडे लक्ष ठेवू नका. पूर्णवेळ लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत,' असं विराट म्हणाला. तर जिंकण्यासाठी चांगला मार्ग शोधा सुपरस्पोर्ट, असं अश्विन स्टम्प माईकसमोर जाऊन म्हणाला. संपूर्ण देशच आमच्याविरुद्ध खेळत असल्याचं वक्तव्य केएल राहुलने केलं.

भारतीय खेळाडूंनी अशी वादग्रस्त वक्तव्यं केली असली तरी आयसीसीने खेळाडूंनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं आयसीसीने सांगितलं. दुसरीकडे विराटनेही माझ्यासाठी हा विषय आता संपला असल्याची प्रतिक्रिया दिली.

First published:

Tags: Cricket news, South africa, Team india, Virat kohli