विराटचा ऐतिहासिक दणका, आफ्रिकेवर पहिल्यांदाच ओढवली 'ही' नामुष्की

विराटचा ऐतिहासिक दणका, आफ्रिकेवर पहिल्यांदाच ओढवली 'ही' नामुष्की

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकेचे दुसऱ्या डावात दोन फलंदाज बाद झाले आहेत.

  • Share this:

पुणे, 13 ऑक्टोबर : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे. यासह विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे ज्यानं दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडलं आहे. विराटच्या द्विशतकाच्या जोरावर भारतानं 601 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर डाव घोषित करुन आफ्रिकेला पहिल्या डावात 275 धावांवर गुंडाळले आणि फॉलोऑन दिला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा 50 वा सामना आहे. विराटने या सामन्यात त्याची सर्वोत्तम कामिगिरी करताना द्विशतकी खेळी साकारली. त्यानंतर आफ्रिकेला फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय कर्णधाराने पाहुण्या संघाला फॉलोऑन दिला आहे. विराट दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताला सर्वाधिक कसोटी जिंकून देणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्र सिंग धोनी या कर्णधारांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती. गेल्या दहा वर्षात आफ्रिकेला कोणत्याही संघाने फॉलोऑन दिला नव्हता.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने फक्त एकदाच एका डावाने विजय साजरा केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक डाव 57 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यात धोनीला फॉलोऑन देण्याची संधी मिळाली नव्हती.

आफ्रिकेचा संघ पहिल्या 275 धावांवर बाद झाल्यामुळं भारताकडे आता तब्बल 326 धावांची आघाडी आहे. भारताकडून अश्विननं सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या. पहिल्या डावात विराट आणि मयंकनं तुफानी फलंदाजी केल्यानंतर आफ्रिकेचे फलंदाज अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. तरी, गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशव महाराजनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केशवच्या 72 धावांच्या खेळीमुळं आफ्रिकेनं 275 धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाच्या अंती भारतानं चांगली गोलंदाजी करत 275 धावांवर बाद केले.

First published: October 13, 2019, 10:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading