मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : वनडेसाठी टीम जाहीर, रोहितला अखेर विश्रांती, केएल राहुल कॅप्टन!

IND vs SA : वनडेसाठी टीम जाहीर, रोहितला अखेर विश्रांती, केएल राहुल कॅप्टन!

Photo-BCCI

Photo-BCCI

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट टीमची घोषणा करताना रोहित शर्माला वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन जाहीर करण्यात आले होते

मुंबई, 31 डिसेंबर :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील कसोटी सामना संपला असून वन डे सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज वन डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे.  तर केएल राहुलवर (KL Rahul as Captain) कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

19 जानेवारीपासून दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची वन-डे मालिका होणार आहे. वन-डे टीमचा नवा कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसचा संभ्रम अजून कायम होता. त्यामुळे आज झालेल्या बैठकीनंतर रोहितला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच्या जागीच टीम इंडियाचं नेतृत्त्व केएल राहुल करणार आहे. विशेष म्हणजे, जसप्रित बुमरावर उप कॅप्टनपदाची जबाबदारी दिली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट टीमची घोषणा करताना रोहित शर्माला वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याला दुखापत झाली आणि तो टेस्ट सीरिजसाठी आफ्रिकेला जाऊ शकला नाही. रोहित वन-डे सीरिज देखील खेळू शकणार नाही त्यामुळे केएल राहुल (KL Rahul) या टीमची कॅप्टनसी करणार आहे.

अशी असेल टीम इंडिया

केएल राहुल (Capt), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वाय चहल, आर अश्विन, वाश्गिटन सुंदर, जे बुमराह (vc), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसीद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज

(राणी लक्ष्मीबाईंचा 'समर पॅलेस'! इथे गुन्हेगारांसाठी होती मृत्यूची विहीर)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी ओपनिंग बॅटर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आणि ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांनीही विजय हजारे स्पर्धेत जोरदार कामगिरी केली होती. गायकवाडनं 5 मॅचमध्ये 150.75 च्या सरासरीनं 603 रन केले, यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे.

तर व्यंकटेश अय्यरनंही या स्पर्धेत 70 पेक्षा जास्त सरासरीनं रन करत दावेदारी सादर केली आहे. त्याचबरोबर अनुभवी बॅटर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) ला सुद्धा संधी देण्यात आली आहे. धवनसाठी विजय हजारे स्पर्धा निराशाजनक ठरली. मात्र 2021 या वर्षात तो टीम इंडियाकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा बॅटसमन आहे, त्यामुळेच त्याला संधी देण्यात आली.

First published: