VIDEO : उमेश यादवचा विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

भारताचा गोलंदाज उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात फलंदाजी करताना 10 चेंडूत 5 षटकारांच्या सहाय्याने 31 धावा केल्या. यासह त्याने 45 वर्षांपूर्वींचा विक्रम मोडला.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 11:26 AM IST

VIDEO : उमेश यादवचा विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

रांची, 21 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. यात रोहित शर्माने द्विशतक तर अंजिक्य रहाणेनं शतकी खेळी केली. त्याशिवाय भारताचा गोलंदाज उमेश यादवने दुसऱ्या सत्रात केलेल्या फटकेबाजीची चर्चा जोरात रंगली आहे. उमेश यादवनं 10 चेंडूत 31 धावांची खेळी केली. यात तब्बल 5 षटकारांचा समावेश होता.

उमेश यादवने कसोटीमध्ये टी20 सारखी फलंदाजी करून अनेक विक्रम नावावर केले. उमेश यादवने त्याच्या खेळीतील पाचही षटकार एकाच खेळाडूच्या गोलंदाजीवर मारले. उमेश यादवनं त्याच्या खेळीत लिंडेच्या 8 आणि पीटच्या 2 चेंडूंचा सामना केला. यात पीटच्या गोलंदाजीवर फक्त एक धाव काढली. त्यानंतर उरलेल्या 8 चेंडूत 5 षटकारांसह 30 धावा केल्या .लिंडेच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात एकही चौकार न मारता 5 षटकार लगावणारा उमेश यादव पहिला फलंदाज ठरला आहे. 10 चेंडूत 31 धावांची खेळीसुद्धा सर्वात वेगवान 30 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये आहे. 10 चेंडूत सर्वाधिक धावा करणाऱा फलंदाज ठरला आहे. याआधी कीथ बॉयसने 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध 26 धावांची खेळी केली होती. त्यानंतर टीम साउथीचा नंबर लागतो. त्याने 2019 मध्ये लंकेविरुद्ध नाबाद 24 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या क्रमांकवर कपिल देव असून त्यांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 धावा केल्या होत्या.

कसोटीत डावाच्या सुरुवातीला पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार मारणारा उमेश यादव जगातील तिसरा आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी 1948 मध्ये फोफी विलियम्सने इंग्लंडविरुद्ध आणि 2013 मध्ये सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

Loading...

उमेश यादवने 310 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. त्याने न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगचा 15 वर्ष जुना विक्रम मोडला. फ्लेमिंगने 2004 मध्ये 11 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि एक षटकार मारला होता.

जॉर्ज लिंडेच्या चेंडूवर षटकार खेचून उमेश यादवनं खातं उघडलं. त्यानंतर पुढच्या चेंडूवरही उमेश यादवने षटकार खेचला. त्यावेळी चाहत्यांसह ड्रेसिंगरूममध्ये असलेल्या विराट कोहलीलासुद्धा आनंद लपवता आला नाही. इकडे मैदानावर जॉर्ज लिंडेनं उमेश यादवसमोर हात जोडले होते.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...