INDvsSA 3rd T20 : शेवटच्या सामन्यावर आस्मानी संकट? जाणून घ्या हवामानाची स्थिती

INDvsSA 3rd T20 : शेवटच्या सामन्यावर आस्मानी संकट? जाणून घ्या हवामानाची स्थिती

चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय संघाला गेल्या दोन टी20 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 22 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना बेंगळुरूत रविवारी सायंकाळी होणार आहे. मोहालीत झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत आघाडी मिळवली आहे. त्याआधीच्या धर्मशालात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात पावसाचा खेळ झाला होता. आता तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे ढग आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार बेंगळुरूत पावसाचे वातावरण आहे.

सकाळपासून काळे ढग पसरले आहेत. सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. तसेच पावसासोबत वादळी वाऱेही येऊ शकतात. पावसाची शक्यता 56 टक्के असून रात्री 40 टक्के पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

बेंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तिसरा सामना होणार आहे. फलंदाजांसाठी हे मैदान नंदनवन मानलं जातं. फलंदाज इथं मोठे फटके सहजपणे खेळू शकतात. दुसरीकडे फिरकीपटूंसाठी खेळपट्टी अनुकूल असेल. 2019 च्या आयपीएलमध्ये या मैदानावर सरासरी 180 धावा एका डावात निघाल्या होत्या.

एम चिन्नास्वामीवर भारताने आतापर्यंत जितके सामने जिंकले आहेत तितकेच गमावले आहेत. आतापर्यंत मैदानावर चार टी20 सामने खेळले असून दोन विजय तर दोनवेळा पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्यांदा बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर या मैदानावर गेल्या दोन्ही सामन्यात भारताचा पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाकडून या मैदानावर पराभव झाला होता. त्यामुळे रविवारच्या सामन्यात भारत मागच्या पराभवाचा डाग पुसणार का याची उत्सुकता असेल.

VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

Published by: Suraj Yadav
First published: September 22, 2019, 1:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading