उमेश यादवचा चेंडू लागल्यानं फलंदाज मैदानावरच बसला, वेळेआधी घेतला टी-ब्रेक

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या सामन्यात 162 धावांत गुंडाळलं. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांची घसरगुंडी उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 04:26 PM IST

उमेश यादवचा चेंडू लागल्यानं फलंदाज मैदानावरच बसला, वेळेआधी घेतला टी-ब्रेक

रांची, 21 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीवर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून विजयी आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या कसोटीत भारातने पहिला डाव 497 धावांवर घोषित केला. त्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर गुंडाळून फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात त्यांची अवस्था 4 बाद 26 अशी झाली होती. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा उसळता चेंडू डीन एल्गरच्या हेल्मेटवर इतक्या जोरात आदळला की तो खेळपट्टीवरच बसला.

उमेश यादवने डीन एल्गरला टाकलेला चेंडू त्याच्या कानाजवळ लागला. यानंतर तो मैदानावरच बसला. तेव्हा विराट कोहलीसह टीम इंडियाचे खेळाडू एल्गरजवळ पोहचले. फिजिओसुद्धा डीन एल्गरला पाहण्यासाठी मैदानावर आले. त्याच्या दुखापतीमुळे चहापानाची घोषणा वेळेआधीच केली. एल्गरला टाकलेला चेंडू 145 किलोमीटर प्रतितास इतका वेगवान होता.

चहापानानंतर एल्गर खेळायला मैदानात उतरला नाही. त्याच्या जागी जॉर्ज लिंडे हेनरिक क्लासेनसोबत आला. एल्गरला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लवकरच त्याच्या प्रकृतीबद्दलची माहिती देण्यात येईल असं दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून सांगण्यात आलं आहे. एल्गरच्या जागी थ्युनिस डिब्रून सामन्यात खेळेल असं सांगितलं जात आहे.

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. रोहित शर्माचे द्विशतक, अजिंक्य रहाणेचं शतक आणि जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 497 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला मैदानात उतरलेल्या आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांत संपुष्टात आला. झुबेर हमजाचे अर्धशतक आणि बावुमा-लिंडे वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

Loading...

पहिल्या डावात आफ्रिकेची अवस्था 3 बाद 16 अशी झाली होती. त्यानंतर हमजा आणि टेम्बा बावुमा यांनी डाव सावरला. मात्र अर्धशतक झाल्यानंतर हमजाला जडेजाने बाद केलं. त्यानंतर आफ्रिकेची घसरगुंडी उडाली. भारताकडून पहिल्या डावात उमेश यादवने 3 तक मोहम्मद शमी, शाहबाज नदीम आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: IND VS SA
First Published: Oct 21, 2019 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...